Sugarcane Harvester Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Harvester : ऊस तोडणीयंत्र कर्ज सुलभ करण्याच्या सूचना

Sugarcane Harvester Subsidy : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ऊस तोडणी यंत्रासाठी (हार्वेस्टर) केंद्राने कर्ज अनुदान योजना लागू केली आहे. त्यामुळे बॅंकांनी कर्जप्रक्रिया सुलभ करावी, अशा सूचना साखर आयुक्तालयाने दिल्या आहेत.

Team Agrowon

Sugarcane Harvester Loan : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ऊस तोडणी यंत्रासाठी (हार्वेस्टर) केंद्राने कर्ज अनुदान योजना लागू केली आहे. त्यामुळे बॅंकांनी कर्जप्रक्रिया सुलभ करावी, अशा सूचना साखर आयुक्तालयाने दिल्या आहेत.

साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी राज्यातील सर्व बॅंकांच्या मुख्य कार्यकारी व्यवस्थापक व महाव्यवस्थापकांना दिलेल्या एका पत्रात ऊस तोडणीयंत्रांची कर्ज प्रकरणे जलदरित्या हाताळण्याच्या सूचना दिल्या आहेत. ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना ही केंद्र व राज्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. यात बॅंकांची भूमिका प्रमुख आहे.

अर्जदाराला पूर्वसंमती मिळाल्यापासून ९० दिवसांच्या आत यंत्र खरेदीचे बंधन यात आहे. त्यामुळे बॅंकांनी कर्ज मंजुरी प्रक्रियेतील यंत्रणेला यातील महत्त्वाचे मुद्दे निदर्शनास आणून द्यावेत, असे आयुक्तालयाने सूचित केले आहे.

ऊसतोडणी यंत्रासाठी आपल्या बॅंकेकडे आलेली कर्जमंजुरी प्रकरणे तत्काळ मंजूर झाली तरच संबंधित अर्जदारांच्या बॅंक खात्यात तोडणी यंत्राचे अनुदान जमा होणार आहे. त्यामुळेच बॅंकांनी या योजनेच्या कामाला प्रथम प्राधान्य द्यायला हवे, असेही आयुक्तालयाने बॅंकांना सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT