Sugarcane Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Disease : ऊस पिकातील चाबूक काणी रोगाचे नियंत्रण

Sugarcane Fungal Disease : ऊस पिकामध्ये बदलत्या वातावरणामुळे चाबूक काणी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगाचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो.

Team Agrowon

रवींद्र पालकर, डॉ. गणेश कोटगिरे, डॉ. अभयकुमार बागडे

ऊस पिकामध्ये बदलत्या वातावरणामुळे चाबूक काणी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. रोगाचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो. पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव होतो. लागण ऊसापेक्षा खोडवा उसात रोगाचे प्रमाण जास्त आढळते. रोगामुळे लागवडीच्या पिकामध्ये २९ टक्के; तर खोडवा पिकात ७० टक्‍क्‍यांपर्यंत उत्पादनामध्ये नुकसान होते. त्यासाठी वेळीच नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

रोगाची लक्षणे

रोगग्रस्त उसाच्या शेंड्यामधून चाबकासारखा चकचकीत चांदीसारखे पातळ आवरण असलेला व शेंड्याकडे निमुळता झालेला १ ते १.५ मीटर लांबीचा पट्टा बाहेर पडतो. या पट्ट्यावरील आवरण तुटल्यानंतर आतील काळा भाग दिसतो. तो भाग म्हणजेच या रोगाचे बीजाणू.

साधारणतः १० ते १२ सें.मी. लांब पट्ट्यात ५० ते ५५ कोटी बीजाणू असतात. हे बीजाणू हवेद्वारे विखुरतात व निरोगी उसाचे डोळ्यावर पडतात. हे बीजाणू रोगाचा प्रसार करतात.

रोगट बेटातील ऊस कमी जाडीचे राहतात. पाने अरुंद व आखूड राहतात. कधी कधी बेटात जास्त फुटवेदेखील आढळतात.

उभ्या उसास रोगाची लागण झाल्यास काणीयुक्त पांगशा फुटतात. कालांतराने रोगट बेटे व ऊस वाळून जातात. त्यामुळे ऊस उत्पादनावर व साखर उताऱ्यावर विपरीत परिणाम होतो.

प्रसार

मुख्यत्वे प्रादुर्भावग्रस्त बेण्यामार्फत तर दुय्यम प्रसार हवा, पाऊस, पाणी, कीटक व जमिनीमार्फत पसरतो.

रोग नियंत्रण

निरोगी बेणे वापरावे. रोग प्रतिकारक वाणांचा वापर करावा.

लागवडीच्या उसात प्रादुर्भाव ५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अशा खोडवा घेऊ नये.

ऊस बेण्यास लागवडीपूर्वी बाष्प उष्ण हवा प्रक्रिया सयंत्राद्वारे ५४ अंश सेल्सिअस तापमानात १५० मिनिटे प्रक्रिया करावी. त्यानंतर लागणीपूर्वी बेण्यास कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात प्रक्रिया करावी. (ॲग्रेस्को शिफारस)

पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.

शेतात काणीचा पट्टा दिसताच तो प्लॅस्टिकच्या पिशवीत अलग कापून घ्यावा. नंतर संपूर्ण बेट मुळासकट उपटून जाळून नष्ट करावे.

- डॉ. गणेश कोटगिरे,

८७८८१५३३३२

- रवींद्र पालकर, ८८८८४०६५२२

(डॉ. कोटगिरे हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी, जि. पुणे तर रवींद्र पालकर हे आचार्य पदवीचे विद्यार्थी आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT