Sugarcane Rate FRP agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : ऊसदराचा तिढा अद्याप कायम

Raju Shetty : जोपर्यंत दत्त इंडिया ऊसदर जाहीर करत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. जिल्ह्यातील आंदोलन तीव्र करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

अभिजीत डाके

Sangli News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दत्त इंडिया कारखान्यावर तब्बल २९ तास आंदोलन केल्यानंतर जिल्हाधिकारी, साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात सोमवारी (ता. ११) सहा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली.

या बैठकीत ऊस दराबाबत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाले. जोपर्यंत दत्त इंडिया ऊसदर जाहीर करत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. जिल्ह्यातील आंदोलन तीव्र करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, कोल्हापूरचे सह संचालक (साखर) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, संदीप राजोबा, महेश खराडे, जिल्ह्यातील सोनहिरा, विश्वास, तासगाव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, दत्त इंडियाचे उपाध्यक्ष संजय शिंदे उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यातील ऊस दराचा प्रश्न रविवारपासून (ता. १०) पेटला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी कार्यकर्ते यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. मात्र ऊस दराची फोडण्यासाठी प्रशासन आणि दत्त इंडियाचे प्रशासन यांच्याकडून सोमवारी दुपारपर्यंत कोणत्याही हालचालीस सुरू नव्हत्या.

दरम्यान वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची उमेदवाराची कोंडी फोडण्यासाठी चर्चा केली. मात्र ही चर्चा सफल झाली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांनी जिल्हा प्रशासनाबरोबरच बैठक घ्यावी, असा आग्रह धरला. त्यामुळे दुपारनंतर जिल्हाधिकारी यांच्याशी कारखाना प्रशासनाने संपर्क साधून जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीच्या हालचाली सुरू झाल्या. दुपारी दोनच्या दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीचा निर्णय झाला. त्यानुसार सोमवारी (ता. ११) सायंकाळी सहा वाजता बैठक झाली.

दालमिया कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन

मंगळवारी (ता. १२) शिराळा येथील दालमिया कारखान्यावर काटा बंद आंदोलन करणार असून बुधवारी (ता. १३) ‘सोनहिरा’वर आंदोलन कधी करणार हे जाहीर केले जाईल. राजू शेट्टी दत्त इंडिया कारखाना येथेच थांबणार आहेत, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Late Kharif Onion : लेट खरीप कांदा लागवडी १.८२ लाख हेक्टरवर

Onion Crop Damage : शेतकऱ्याने कांद्यावर फिरविला रोटावेटर

Cotton Import : पाकिस्तान ठरला अमेरिकन कापसाचा सर्वांत मोठा आयातदार

Nafed Onion Procurement : ‘नाफेड’च्या कांदा खरेदी गैरव्यवहारांची गांभिर्याने चौकशी

Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला हुडहुडी

SCROLL FOR NEXT