Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP: उसाच्या एफआरपीत १५ रुपयांची वाढ; क्विंटलला मिळणार ३५५ रुपये दर

Government Hike Sugarcane FRP: २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत १५ रुपयांची वाढ करत १०.२५% साखर उताऱ्यासाठी प्रतिक्विंटल ३५५ रुपये दर निश्चित केला आहे. ९.५% पेक्षा कमी उताऱ्यावरही शेतकऱ्यांना किमान ३२९ रुपये एफआरपी मिळणार आहे.

Anil Jadhao 

Pune News: केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत क्विंटलमागे १५ रुपयांची वाढ केली आहे. आता गाळप हंगाम २०२५-२६ साठी १०.२५ टक्के साखर उताऱ्यासाठी क्विंटलला ३५५ रुपये एफआरपी मिळणार आहे. तसेच ९.५ टक्क्यापेक्षा कमी उतारा असला तरी जास्त कपात न करता ३२९ रुपये एफआरपी देण्यात येईल, असा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.३०) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एफआरपी वाढीसंदर्भात निर्णय घेण्यात आला. २०२४-२५ च्या गाळप हंगामात १०.२५ टक्के उताऱ्यासाठी उसाला ३४० रुपये प्रतिक्विंटलची एफआरपी होती. आता २०२५-२६ च्या हंगामात (ऑक्टोबर २०२५ ते सप्टेंबर २०२६) उसाला ३५५ रुपये एफआरपी मिळणार आहे.

म्हणजेच मागील हंगामाच्या तुलनेत १५ रुपयांची वाढ करण्यात आली. साखर उतारा १०.२५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर प्रत्येक ०.१ टक्क्यामागे ३.४६ रुपये जास्त एफआरपी मिळेल. तसेच १०.१५ टक्क्यांपेक्षा उतारा कमी असेल तर प्रत्येक ०.१ टक्क्यामागे ३.४६ रुपये कमी एफआरपी दिली जाईल, असाही निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

उसाच्या उत्पादन खर्चावर १०५ टक्के अधिक एफआरपी जाहीर केल्याचा दावा केंद्राने केला. उसाचा A2+FL सुत्रानुसार उत्पादन खर्च क्विंटलला १७३ रुपये येतो. पण केंद्राने १०.२५ टक्के उताराऱ्यासाठी ३५५ रुपये प्रतिक्विंटल एफआरपी जाहीर केली. म्हणजेच उत्पादन खर्चावर १०५ टक्के नफ्यासह एफआरपी जाहीर केली, असाही दावा केंद्राने केला आहे. 

किमान ३२९ रुपये मिळणार

ऊस उत्पादकांना केंद्राने पुन्हा एक दिलासा दिला आहे. साखर उतारा १०.२५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर ०.१ टक्क्यामागे ३.४६ रुपये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण कारखान्याचा साखर उतारा ९.५ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्यापुढे कपात करता येणार नाही. शेतकऱ्यांना ९.५ टक्के उताऱ्याप्रमाणे म्हणजेच ३२९ रुपये एफआरपी द्यावी, असाही निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.

एफआरपी थकबाकी

चालू गाळप हंगामात गाळप केलेल्या उसाच्या बिलापोटी देशातील शेतकऱ्यांना ९७ हजार २७० कोटी रुपयांची एफआरपी देणी होती. त्यापैकी २८ एप्रिलपर्यंत ८५ हजार ९४ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. एकूण एफआरपीच्या ८७ टक्के रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली. तसेच गाळप हंगाम २०२३-२४ मधील एकूण १ लाख ११ हजार ७८२ कोटी रुपये एफआरपी देणी होती. त्यापैकी २८ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना १ लाख ११ हजार ७०३ कोटी रुपये देण्यात आले. म्हणजेच गेल्या हंगामातील ९९.९२ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना मिळाली आहे, असेही केंद्राने स्पष्ट केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT