Sugarcane cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : खानदेशात २७ हजार हेक्टरवर ऊस लागवड

Sugarcane Season 2023 : खानदेशात ऊस लागवडीत मागील हंगामात काहीशी वाढ झाली. ही लागवड सुमारे २७ हजार हेक्टरवर पोचली आहे. सर्वाधिक १४ हजार हेक्टरवर लागवड जळगाव नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात ऊस लागवडीत मागील हंगामात काहीशी वाढ झाली. ही लागवड सुमारे २७ हजार हेक्टरवर पोचली आहे. सर्वाधिक १४ हजार हेक्टरवर लागवड जळगाव नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टरवर आणि धुळ्यात चार हजार हेक्टरवर ऊस लागवड झाल्याची माहिती आहे.

लागवड काही भागात सुरूच आहे. आणखी सुमारे ५०० ते ६०० हेक्टरवर लागवड होईल. परंतु कमाल शेतकऱ्यांची लागवड किंवा लागवड नियोजन पूर्ण झाले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात साखर कारखाने अधिक कार्यरत आहेत. शिवाय मध्य प्रदेश, गुजरातमधील कारखानेदेखील खरेदी करतात. यामुळे नंदुरबारात लागवड अधिक आहे. शिवाय तापी, सुसरी नदीच्या लाभक्षेत्रात जलसाठे मुबलक आहेत.

इतर पिकांची स्थिती बेभरवशाची झाली आहे. अनेकदा दरही परवडत नाहीत. यामुळे शेतकरी उसाकडे वळत आहेत. धुळ्यातही शिरपूर, धुळे, साक्री तालुक्यात ऊस पीक आहे. धुळ्यातून मध्य प्रदेश, नाशिक भागातील कारखाने उसाची खरेदी करतात. यामुळे या भागात ऊस पिकाची लागवड किंचित वाढली आहे.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, चाळीसगाव तालुक्यात अधिकची ऊस लागवड झाली आहे. तसेच यावल, मुक्ताईनगर भागातही ऊस लागवड स्थिर आहे. ऊस लागवड खानदेशात गेले दोन वर्षे वाढली आहे. कारण पाऊस चांगला किंवा सरासरीपेक्षा अधिक झाला आहे.

ऊस पिकात चांगले वाण, ठिबकची यंत्रणादेखील बऱ्यापैकी उत्पादनदेखील शेतकरी घेवू शकत आहेत. जळगाव जिल्ह्यातही तीन खासगी कारखाने सुरू आहेत. पुढे न्हावी (ता.यावल) येथील मधुकर कारखानादेखील सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.

यामुळे ऊस लागवड वाढत आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा भागात नाशिक, औरंगाबाद, नगरमधील कारखाने खरेदी करतात. शिवाय भोरस येथेही साखर कारखाना सुरू झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT