Sugarcane Jalgaon Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Jalgaon : खानदेशात ऊस गाळप पोहोचले २४ लाख टनांवर

Jalgaon Agriculture : खानदेशात ऊस गाळप यंदाही नोव्हेंबरमध्ये सुरू झाले. गाळप पूर्ण झाले असून, यंदाचे गाळप २४ लाख टनांवर गेल्याची माहिती आहे. कारखान्यांनीही गाळपासाठी गतीने कार्यवाही केली.

Team Agrowon

Sugarcane Crushing : ऊस गाळपात नंदुरबारने मागील वेळेस आघाडी घेतली होती. नंदुरबारमधील समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील खासगी कारखान्याने प्रतिदिन साडेनऊ हजार टन ऊस गाळप केले होते. यंदाही नंदुरबारमध्ये तीन साखर कारखाने सुरू होते. धुळ्यात एक लहान कारखाना सुरू होता. तेथे रोज ६०० ते ७०० टन उसाचे गाळप केले जात होते.

जळगाव जिल्ह्यातही दोन कारखाने सुरू होते. यंदाही नंदुरबारमध्ये तीन, धुळ्यात एक व जळगावात दोन कारखाने सुरू होते. जळगावातील दोन्ही कारखाने खासगी व्यवस्थापनाचे आहेत. जळगाव जिल्ह्यात चहार्डी (ता. चोपडा), घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) येथील कारखाने सुरू होते. नंदुरबारमधील कारखान्यांकडून अधिकचे गाळप झाले आहे. सर्वाधिक गाळप समशेरपूर येथील कारखान्याने केले. त्यापाठोपाठ जळगावातील कारखान्यांनी गाळप केले.

उसाची लागवड नंदुरबारमध्ये अधिक होती. तेथे सुमारे १५ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. त्या पाठोपाठ जळगाव जिल्ह्यात सुमारे १४ हजार हेक्टरवर ऊस पीक होते. उसाची लागवड नंदुरबारमध्ये अधिक असल्याने तेथे ऊस तोडणी व अन्य कार्यवाहीसाठी राबता सतत दिसला.

यंदा डिसेंबरमध्ये पाऊस व गारपीट झाली. या कालावधीत काही कारखाने दोन-तीन दिवस बंद होते. परंतु अन्य कालावधीत कारखान्यांत गाळपास गती होती. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव व चोपडा भागात ऊस तोडणी व गाळपासंबंधी कार्यवाही गतीने झाली.

अन्य भागांतूनही मागणी

खानदेशात नाशिक, छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगर जिल्ह्यातील कारखानेदेखील उसतोडणी करीत होते. धुळ्यातील साक्री, जळगावमधील चाळीसगाव, चोपडा भागात अन्य जिल्ह्यांतील कारखाने येऊन ऊस तोडणी करीत होते. अनेक शेतकऱ्यांनी नाशिक, छत्रपती संभाजीनगरमधील कारखान्यांना ऊस दिला. नंदुरबारमधील काही शेतकऱ्यांनी गुजरातेतील खासगी कारखान्यांना ऊस दिल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT