Sunetratai Pawar  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production : साखरेऐवजी उपपदार्थनिर्मिती ठरेल फायदेशीर

Sugarcane Farmers : चालू वर्षी अनेक भागात पाऊस अत्यंत कमी झाला आहे, काही भागात पडलाच नाही, त्यामुळे साखर कारखाने चालविणे अवघड झाले आहे.

Team Agrowon

Solapur News : चालू वर्षी अनेक भागात पाऊस अत्यंत कमी झाला आहे, काही भागात पडलाच नाही, त्यामुळे साखर कारखाने चालविणे अवघड झाले आहे. कारखान्यांनी केवळ साखर उत्पादित न करता उपपदार्थ निर्मिती केली, तरच सभासदांना जादा दर देता येणार आहे. त्यामुळे कारखान्यांनी त्यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे, असे मत बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांनी केले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा प्रारंभ अध्यक्षा श्रीमती पवार यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. त्यावेळी त्या सभासदांना मार्गदर्शन करीत होत्या. आमदार यशवंत माने अध्यक्षस्थानी होते.

यावेळी कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार राजन पाटील, कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, राजश्री पाटील, डॉ विनिता पाटील, अॅड प्रियंका पाटील कारखान्याचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, रामचंद्र शेळके, अनिल कादे, भारत सुतकर, शिवाजी चव्हाण, दुध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी यावेळी उपस्थित होते.

सौ. पवार म्हणाले, की आज अनेक कारखाने ऊसाची उपलब्धतेसह अन्य कारणांमुळे अडचणीत आहेत, अशाही स्थितीत लोकनेते साखर कारखाना कर्जमुक्त करण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारचे कर्ज न घेता सभासदांना हप्ता दिला, हे कौतुकास्पद आहे, असेही त्या म्हणाल्या.

कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार पाटील म्हणाले, चालु वर्षी साखरेला चांगला भाव मिळाल्याने सभासदांना सन २०२२-२३ या गाळप हंगामात गाळपास आलेल्या उसाला दिवाळीच्या सणासाठी प्रतिटन शंभर रुपयाचा हप्ता देण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश

Sugar MSP: साखर 'एमएसपी' प्रश्नी दिल्लीतील बैठक निष्फळ, उद्यापासून महाराष्ट्र-कर्नाटकातील महामार्ग रोखणार, राजू शेट्टींचा इशारा

Canal Repair : पहिल्या आवर्तनापूर्वी कालव्यांची दुरुस्ती करा

Solar Irrigation : सातारा जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेुळे उजळणार

Water Tanker Surge : टॅंकरच्या संख्येत झपाट्याने वाढ

SCROLL FOR NEXT