Sugar Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Market : फेब्रुवारीसाठी २२ लाख टनांचा साखर विक्री कोटा

Sugar Rate : दराबरोबरच विक्रीतही घट झाल्याने कारखाने अस्वस्थ

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

राजकुमार चौगुले : ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar sales quota : कोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांना केंद्राने फेब्रुवारी महिन्यासाठी २२ लाख टन साखरेचा विक्री कोटा जाहीर केला आहे. हा कोटा गेल्या हंगामातील फेब्रुवारीच्या तुलनेत एक लाख टनांनी जादा आहे.
कारखाना सूत्रांनी सांगितले, की साखरेला दर नसल्याने अनेक साखर कारखान्यांना साखरेची विक्री करणे अडचणीचे बनत आहे. त्यामुळे बाजारात साखरेच्या दरात मंदी आली आहे. दोन महिन्यांपूर्वी ३६५० रुपये क्विंटलपर्यंत असणारे साखरेचे दर ३४५० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत.

अनेक कारखान्यांनी या दरात साखरेची विक्री न केल्याने बहुतांशी कारखान्यांचा जानेवारीचा कोटा ही अद्याप संपलेला नसल्याची माहिती कारखाना प्रतिनिधींनी दिली.
सध्या देशातील साखर हंगाम निम्याहून अधिक झाला आहे. साखरेचे उत्पादन गेल्यावर्षी तुलनेत कमी असले तरी फार चणचण भासेल अशी शक्यता नाही. बाजारामध्ये साखर मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल असे वातावरण तयार झाल्याने व्यापारीही मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी करण्यासाठी तयार नसल्याचे चित्र आहे. यामुळे निविदा कमी दराने तयार निघत आहेत.

येणाऱ्या कालावधीत उन्हाळ्यापर्यंत कोणतेही मोठे सण नसल्याने साखरेची खरेदी फार वेगाने होत नसल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. कोल्हापूर सारख्या ठिकाणी विक्रीमध्ये ५० टक्क्यांची घट आली आहे. केंद्र शासनाने यंदाचा गाळप हंगाम सुरू झाल्यापासून ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२४ या चार महिन्यांसाठी एकूण ९९ लाख टन कोटा कारखान्यांना खुल्या बाजारात विक्रीसाठी दिला. गत गाळप हंगामात याच चार महिन्यांसाठी ८९ लाख टन कोटा दिला होता. गेल्या महिन्याच्या तुलनेत जवळ १० टक्के जादा साखरेचा कोटा बाजारात आहे. याचा दर वाढण्यावर नकारात्मक परिणाम होत आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून केंद्राने साखरेची बाजारात चणचण होऊ नये यासाठी सातत्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक महिन्याला एक ते दोन लाख टनांनी साखर कोटे वाढवून दिले आहेत. यंदाच्या हंगामात तयार होणारी साखर व वाढलेल्या कोट्यामुळे कारखान्यावर येणारा साखर विक्रीचा दबाव यामुळे साखर बाजारात फारसे उत्साहाचे वातावरण नसल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.


साखरेची विक्री पुरेशा प्रमाणात होत नसल्याने कारखाने अडचणी येण्याची शक्यता आहे. बँकांची कर्जे भरताना कारखान्यांची दमछाक होत आहे.
- पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT