Sugar Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : केंद्राकडून जानेवारीसाठी २३ लाख टनांचा साखर कोटा

Sugar Quota : केंद्र सरकारने जानेवारी महिन्‍यासाठी २३ लाख टनांचा साखर कोटा गुरुवारी (ता. २८) जाहीर केला.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Kolhapur News : कोल्हापूर ः केंद्र सरकारने जानेवारी महिन्‍यासाठी २३ लाख टनांचा साखर कोटा गुरुवारी (ता. २८) जाहीर केला. अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने एक्स (ट्विटर) या सोशल प्लॅटफार्मवरून हा कोटा जाहीर केला. हा कोटा देशातील साखर कारखान्यांना विभागून देण्यात येणार आहे.
दोन महिन्यांपूर्वी केंद्राने पंधरा-पंधरा दिवसांचे कोटे कारखान्यांना दिले होते.

डिसेंबरमध्‍ये २४ लाख टनांचा साखर कोटा दिला होता. यात १ लाख टनांनी घट करीत केंद्राने हा साखर कोटा २३ लाख टनांपर्यंत कायम ठेवला आहे. नोव्हेंबरमध्येही २३ लाख टनांचा कोटा दिला होता. सध्या देशाचा हंगाम वेगात सुरू झाला आहे.

देशभरात ऑक्टोबरपासून यंदाचा हंगाम सुरू झाला. महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये नोव्‍हेंबरच्‍या उत्तरार्धापासून तोडणीस गती आल्‍यानंतर साखर उत्पादनास वेग आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन कमी होण्‍याच्या शक्यतेने केंद्राने निर्यातबंदीबरोबर इथेनॉल निर्मितीवरही बंधने आणली.

याचबरोबर देशात साखरेची टंचाई होऊ नये यासाठी पंधरा-पंधरा दिवसांचे कोटे जाहीर केले. जानेवारीसाठी मात्र पूर्ण महिन्‍याचा कोटा दिला आहे. सध्‍या तरी देशातील हंगाम चांगला असल्याने पुढील दोन महिन्यांत तरी साखरेची टंचाई जाणवणार नाही, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्‍त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Crisis : दुष्काळी संकट तंत्रज्ञानाच्या पलीकडे; दीर्घकालीन नियोजनाची गरज; कुलगुरू डॉ. विलास खर्चे

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

SCROLL FOR NEXT