Sugarcane Crushing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : मराठवाडा व खानदेशातील वीस कारखान्यांकडून ४६ लाख टन ऊसगाळप

Sugarcane Crushing Season : मराठवाडा व खानदेशातील ५ जिल्ह्यांतील १२ सहकारी व ८ खासगी मिळून २० कारखान्यांनी रविवारपर्यंत (ता. १९) ४६ लाख २२ हजार ८०२ टन उसाचे गाळप केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा व खानदेशातील ५ जिल्ह्यांतील १२ सहकारी व ८ खासगी मिळून २० कारखान्यांनी रविवारपर्यंत (ता. १९) ४६ लाख २२ हजार ८०२ टन उसाचे गाळप केले. या गाळतातून सरासरी ७.३६ टक्के साखर उताऱ्याने ३४ लाख ३२२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.

यंदाचा ऊस गाळप हंगामात सहभागी झालेल्या वीस कारखान्यांपैकी सुमारे १६ कारखाने आपल्या दैनंदिन गाळप हंगामाच्या तुलनेत कमी क्षमतेने गाळप करीत असल्याची स्थिती आहे. जालना जिल्ह्यातील चार कारखान्यांचा गाळप मात्र याला अपवाद आहे. तिथे किंचित गाळप क्षमतेच्या पुढे जाऊन होते आहे.

नंदुरबार : जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी ५ लाख ७ हजार ४५० टन उसाच गाळप करत ३ लाख ३३ हजार २०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ५.९४ टक्के राहिला.

जळगाव : जिल्ह्यातील एका कारखान्याने ७६,८६७ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.१४ टक्के साखर उताऱ्याने ७० हजार २७५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी ९ लाख ५९ हजार १७९ टन उसाचे गाळप करत सरासरी ७.८६ टक्के साखर उताऱ्याने ९ लाख ४०७ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जालना : जिल्ह्यातील चार कारखान्यांनी १० लाख ८२ हजार ६६ टन उसाचे गाळप करत ८ लाख ५० हजार ११० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ७.८६ टक्के राहिला.

बीड ः जिल्ह्यातील सात कारखान्यांनी १९ लाख ४४ हजार २४० टन उसाचे गाळप करत १२ लाख ४९ हजार १७५ क्विंटल साखर उत्पादन केले. कारखान्यांचा सरासरी उतारा ६.४३ टक्के
राहिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Orchard Damage: उष्णता, पूर्वमोसमी पावसाचा संत्रा बागांना मोठा फटका

Hingoli Crop Loan Disbursement: हिंगोलीत पीककर्ज वाटप केवळ १०.०३ टक्के

Fort Conservation: गड संवर्धनासाठी एकवटले मावळे

Mahabeej Seed Sales Stalled: पावसाअभावी ‘महाबीज’च्या बियाण्यांची विक्री ठप्प

Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल मूर्तीवरील रासायनिक प्रक्रियेला न्यायालयाची अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT