Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory Crushing License : गोपीनाथ मुंडे महामंडळाचा भरणा भरा, अन्यथा गाळप परवाना नाही : साखर आयुक्तांचा इशारा

Sugar Commissioner Dr. Kunal Khemnar : राज्यातील २०३ साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळपाचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. तर यंदा १५ नोव्हेवर नंतर गाळप हंगाम सुरू होणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात या महिन्याच्या १५ तारखेनंतर साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरूवात होणार आहे. राज्यातील २०३ साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यासाठी अर्ज केले असून उसतोड मजूर देखील कारखान्यांवर पोहचले आहेत. यामुळे कारखाने कधी सुरू होणार याची वाट उस उत्पादक पाहत असतानाच साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी कारखान्यांना थेट इशारा दिला आहे. खेमनार यांनी, गोपीनाथ मुंडे महामंडळाचा भरणा करा, अन्यथा कारखान्यांना गाळप परवाना दिला जाणार नाही, असे म्हटले आहे.

राज्यातील ऊसतोड कामगारांना विविध कल्याणकारी व सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. यामुळे कारखान्यांकडून काही रक्कम महामंडळाला देणे बंधणकारक आहे. याच रक्कमेवरून खेमनार यांनी कारखान्यांना इशारा दिला आहे.

कारखान्यांनी गाळप हंगाम २०२१-२२ मधील देय असलेल्या प्रती टन चार रुपयांपैकी तीन रुपयांचा भरणा करावा असे आदेश काढले आहेत. तसेच ही रक्कन न भरल्यास संबंधित साखर कारखान्यांना २०२४-२५ हंगामाचा गाळप परवाना दिला जाणार नाही, असेही खेमनार यांनी परिपत्रक काढत इशारा दिला आहे.

याआधीच साखर आयुक्तांनी ९ ऑक्टोबर रोजी याबाबत परिपत्रक काढले होते. तसेच गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये झालेल्या गाळपावरील उर्वरित रक्कम प्रती टन चार रुपये ही हंगाम २०२३-२४ संपल्यानंतर १५ एप्रिल २०२४ पर्यंत भरणा करण्याचे आदेश दिले होते.

तसेच या आदेशात गाळप हंगाम २०२२-२३ मध्ये झालेल्या गाळपावरील रुपये १० प्रतिटनापैकी पाच रुपये निधीची रक्कम ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत व उर्वरित पाच रुपये रक्कम ही ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत भरणा करावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

पण कारखान्यांनी २०२१-२२ मधील देय रक्कम दिलेली नाही. यावरून साखर आयुक्तांनी आता नव्याने आदेश काढत २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार अंमलबजावणी करावी, अन्यथा गाळप परवाना दिला जाणार नाही, असे म्हटले आहे.

दरम्यान राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान २० तारखेला होणार असून २३ ला निकाल लागणार आहे. याआधी राजकीय पक्षांनी ऊस तोड कामगारांना मतदानाचे आवाहन केले होते. पण आता मराठवाडा, विदर्भातील ऊस तोड मजूर साखर कारखान्यांकडे निघाले आहेत. याचा परिणाम निवडणुकीच्या मतदानावर होण्याची शक्यता असून उमेदवारांसह नेते मंडळी धास्तावले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT