Water Extraction Agrowon
ॲग्रो विशेष

Water Extraction : फुपनगरीत पूररेषेत कूपनलिकांद्वारे बेसुमार पाणीउपसा सुरू

Water Update : फुपनगरी (ता. जळगाव) येथे पूररेषेत किंवा नदी पात्रात कूपनलिका खोदून त्यातून बेसुमार पाणीउपसा सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : फुपनगरी (ता. जळगाव) येथे पूररेषेत किंवा नदी पात्रात कूपनलिका खोदून त्यातून बेसुमार पाणीउपसा सुरू आहे. नियम व संकेत डावलून तयार केलेल्या या कूपनलिकांना वीज संयोजन किंवा वीज जोडणी मिळालीच कशी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पूररेषेसंबंधी प्रशासन, यंत्रणेने नियम, निकष लागू केले आहेत. पूररेषेत बांधकाम, पाणीउपसा यासंबंधी संकेत, अटी आहेत. केंद्र व राज्य शासन यांनी याबाबत मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. ब्लू लाइन अॅक्ट किंवा पूररेषा नियंत्रण कायदादेखील त्यासंबधी आहे.

पर्यावरण विभागाही पूररेषेत अतिक्रमण व अवैध कार्यवाही, पाणी, माती, वाळूउपसा होऊ नये यासाठी आग्रही असतो. परंतु फुपनगरी शिवारात पूररेषेसंबंधीचे नियम, संकेत डावलून कूपनलिका खोदण्याचा सपाटा लावण्यात आला. एकामागोमाग कूपनलिका वर्षागणिक खोदण्यात आल्या व बेसुमार पाणीउपसा त्यातून आजही सुरू आहे.

प्रशासन, वीज कंपनीचे दुर्लक्ष

पूररेषेचे नियम व अन्य संकेत डावलून कूपनलिका खोदण्याचा सपाटा सुरू असताना महसूल प्रशासन व अन्य यंत्रणांनी कोणतीही कारवाई केली नाही. कूपनलिका खोदल्यानंतर त्यांना वीज संयोजन किंवा वीज जोडणीदेखील देण्यात आली आहे.

ही वीजजोडणी देताना सात-बारा, शेताचा नकाशा किंवा अन्य बाबींची पडताळणी, तपासणी वीज कंपनीने केली का, स्थळ पाहणी करून वीज जोडणी या कूपनलिकांना दिली का, असा प्रश्नही जागरूक शेतकरी, नागरिक उपस्थित करीत आहेत.

प्रशासनाकडून चौकशीची अपेक्षा

फुपनगरी येथे गट क्रमांक ११ हा शासकीय मालकीचा भूखंड किंवा क्षेत्र आहे. हा गट गिरणा नदीनजीक आहे. या गटातही कूपनलिका असून, त्यात किती वैध व किती अवैध याची चौकशी, तपासणी करण्याची गरज आहे.

जशी वाळू उपशावर कारवाई केली जाते, तशी अवैध व पूररेषेतील पाणी उपशावरही कारवाई करायला हवी, अशी मागणी केली जात आहे. वीज संयोजन किती अश्वशक्तीसाठी दिले आहे, किती अश्वशक्तीचा कृषिपंप किंवा पंप कूपनलिकेत कार्यरत आहे याबाबतही चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT