Farming Experiments Agrowon
ॲग्रो विशेष

Farming Experiments : डहाणूत प्रगत शेतकऱ्यांचे दुर्मीळ पिकांवर यशस्वी प्रयोग

Progressive Agriculture : आधुनिक पद्धतीने ऑर्किड फुलशेतीची लागवड, वाणगावसारख्या ग्रामीण भागातही स्ट्रॉबेरी आणि झुकिनीसारख्या दुर्मीळ पिकांचे प्रयोग डहाणू तालुक्यामध्ये यशस्वी होत आहेत.

Team Agrowon

Palghar News : डहाणू तालुक्यातील आधुनिक विचारसरणीचे शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. चिंचणी, डहाणू, घोलवड, बोर्डी या किनारपट्टी भागात विस्तारलेल्या चिकूच्या बागा, वाणगाव, चिंचणी येथील प्रसिद्ध मिरचीपट्टा, आधुनिक पद्धतीने ऑर्किड फुलशेतीची लागवड, वाणगावसारख्या ग्रामीण भागातही स्ट्रॉबेरी आणि झुकिनीसारख्या दुर्मीळ पिकांचे प्रयोग डहाणू तालुक्यामध्ये यशस्वी होत आहेत.

शेतीतील या प्रयोगाची पाहणी कोकण विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पालघरचे नीलेश भागेश्वर, बालाजी ताटे, प्रफुल्ल बनसोडे यांनी कृषिविषयक कामांची पाहणी करून आढावा घेतला.

पॉलिहाउसमधील ऑर्किडची शेती

आंबिस्तेवाडी येथील रोहिश गांधी यांच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत केलेल्या चिकू लागवडीची पाहणी केली. तर चिंचणीतील रामचंद्र सावे यांच्या पॉलिहाउसमधील ऑर्किड लागवड प्रक्षेत्रास भेट दिली.

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी यासाठी आपल्या गावचे कृषी सहायक व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.
नीलेश भागेश्वर, कृषी अधिकारी
तरुण शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रात नियंत्रित वातावरणात अधिक उत्पादन वाढीसाठी ऑर्किड शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. चिकू आणि मिरची पीक नियंत्रित ठेवण्यासाठी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन व अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करून शेती करावी
अंकुश माने, विभागीय कृषीसहसंचालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer ID : देशातील ९ कोटी २५ लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Digital Farming Training: भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी विशेष डिजिटल शेतीशाळा

Solapur ZP Fund: जि. प., पं. स., सदस्यांना १७१ कोटींची लॉटरी

Kanda Sathwan Rog: कांदा काढणीनंतर रोगांची शक्यता; शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी

Paddy Procurement Drop: रायगड जिल्ह्यात भात खरेदीत घट

SCROLL FOR NEXT