Baramati Agriculture College Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scholarship Exam : 'डॉ. शरदचंद्र पवार कृषी'च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Sharad Pawar Agriculture College : भारतीय कृषी संशोधन परिषद, दिल्लीमार्फत पदव्युत्तर पदवी कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा घेण्यात येते.

Team Agrowon

Baramati News : भारतीय कृषी संशोधन परिषद, दिल्ली यांच्यामार्फत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या अखिल भारतीय प्रवेश (कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती) परीक्षेत डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, बारामती येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

भारतीय कृषी संशोधन परिषद, दिल्लीमार्फत पदव्युत्तर पदवी कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय प्रवेश परीक्षा घेण्यात येते. संपूर्ण भारतातून विद्यार्थीं वेगवेगळ्या विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्यासाठी या परीक्षेची तयारी करतात. परीक्षेतून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरीटनुसार कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्तीसह (ज्युनिअर रिसर्च फेलोशिप) भारतातील नामांकित कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळतो.

बारामती कृषी महाविद्यालयाच्या एकूण आठ विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत संस्थेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व त्यांना प्रवेश मिळालेल्या कृषी विद्यापीठाचे नाव पुढीलप्रमाणे ः पृथ्विराज कोठावळे - डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, पुसा (कृषी अर्थशास्त्र), वैष्णवी अभंग - डॉ. राजेंद्र प्रसाद, केंद्रीय कृषी विद्यापीठ. पुसा (कृषी अर्थशास्त्र), पंकज वाघ - राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, झाशी (वनस्पती विकृतीशास्त्र),

अंजली दहातोंडे - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (कृषी विस्तार शिक्षण), सौरभ नरुटे - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (कृषी सूक्ष्म जीवशास्त्र), सौरभ मुदगलकर - लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवाडा (प्रवेश परीक्षा - अनुवंश व वनस्पती पैदास शास्त्र), राजलक्ष्मी राऊत - लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवाडा (प्रवेश परीक्षा - अनुवंश व वनस्पती पैदास शास्त्र),

कविता मोरे - चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कानपूर (वनस्पती विकृतीशास्त्र). या यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आणि संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे यांनी अभिनंदन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT