Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत लक्षणीय घट

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४-२५ मधील पेरणीचा अंतिम अहवाल नुकताच अंतिम झाला आहे. यंदा जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ९९.८० टक्क्यांनुसार सात लाख ६५ हजार २९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधिक साडेचार लाख ५३ हजार १२८ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. परंतु जिल्ह्यात खरीप ज्वारी, कपाशी, उडीद व मुगाच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय घट दिसून येत आहे.

नांदेड जिल्ह्याचे खरीप हंगामात सात लाख ६६ हजार ८०९ हेक्टर सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. यंदा मृग नक्षत्रात खरिपातील पेरण्यांना प्रांरभ झाला. या पेरण्या जुलेच्या पहिल्या पंधरवाड्यात आटोपल्या. यंदा खरिपातील पेरण्या वेळेत झाल्याने पिकांची वाढही समाधानकारक झाली.

दरम्यान जिल्ह्यात सात लाख ६६ हजार ८०९ सर्वसाधारण पेरणी क्षेत्र आहे. या पेरणी क्षेत्राच्या ९९.८० टक्क्यांनुसार सात लाख ६५ हजार २९१ हेक्टरवर पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. यात सर्वाधिक चार लाख ५३ हजार १२८ हेक्टरवर सोयाबीन, दोन लाख ९ हजार ५६२ हेक्टरवर कपाशी, ६२ हजार ११३ हेक्टरवर तूर, १४ हजार ९३१ हेक्टरवर मूग, १४ हजार ५४६ हेक्टरवर उडीद, ७ हजार ८५८ हेक्टरवर खरीप ज्वारीची लागवड झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्राने दिली.

जिल्ह्यात मागील काही वर्षापासून खरीप ज्वारी, कपाशी, उडीद व मुगाच्या पेरणी क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. खरीप ज्वारीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ४४ हजार ७४० हेक्टर असताना यंदा केवळ १७.५६ टक्क्यांनुसार सात हजार ८५८ हेक्टरवर पेरणी झाली. तसेच मुगाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र २७ हजार ३९२ हेक्टर असताना यंदा केवळ १४ हजार ९३१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

उडदाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र २९ हजार ६२५ हेक्टर असताना यंदा १४ हजार ५४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात वाढ होईल, असे वाटत असताना यात घट झाली आहे. कपाशीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख ४१ हजार २८२ हेक्टर आहे. परंतु कपाशीची लागवड मात्र दोन लाख नऊ हजार ५६२ हेक्टरवर झाली आहे.

जिल्ह्यात खरिपातील अंतिम पेरणी क्षेत्र (क्षेत्र हेक्टरमध्ये)

पीक पेरणी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी

ज्वारी ४४,७४० ७,८५८ १७.५६

मका ८२३ १,५६७ १९०.४०

तूर ६७,४२३ ६२,११३ ९२.१२

मूग २७,३९२ १४,९३१ ५४.५१

उडीद २९,६२५ १४,५४६ ४९.१०

सोयाबीन ३,५३,३१४ ४,५३,१२८ १२८.२५

कपाशी २,४१,२८२ २,०९,५६२ ८६.८५

तीळ ५६५ २७८ ४९.२०

कारळ ३६१ १६९ ४६.८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT