Food Processing  Agrowon
ॲग्रो विशेष

Food Processing Industry Subsidy : अन्न प्रक्रिया उद्योगासाठी मिळणार तीन कोटींपर्यंत अनुदान

Subsidy Update : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यात कृषी प्रक्रिया उद्योजक उभारणीसाठी प्रकल्पाच्या ३५ टक्के, तसेच कमाल तीन कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

Team Agrowon

Buldhana News : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. यात कृषी प्रक्रिया उद्योजक उभारणीसाठी प्रकल्पाच्या ३५ टक्के, तसेच कमाल तीन कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यात शेतकरी उत्पादक कंपन्यांसह शेतकरी गटांना प्राधान्य देण्यात येत आहे.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तरवृद्धीसाठी या योजनेतून एक जिल्हा एक उत्पादन यावर आधारित कृषी प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत भांडवली गुंतवणूक, सामायिक पायाभूत सुविधा, इनक्युबेशन सेंटर, स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यांना बिज भांडवल, मार्केटिंग व ब्रँन्डिंग आदीकरीता अर्थसहाय्य देण्यात येत आहे.

वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० लाख तर सामाईक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन केंद्र, मूल्यसाखळी घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के किंवा कमाल ३ कोटी अर्थ साहाय्य देण्यात येणार आहे. उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला,

भागीदारी संस्था, तसेच गट लाभार्थीमध्ये शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी, शासकीय संस्थांनी कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी किंवा त्यांचे विस्तारीकरण, स्तरवृद्धी व आधुनिकीकरण करण्यासाठी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत सहभाग नोंदवावा. प्रकल्प आराखडे तयार करणे, बँकेकडे सादर करणे, तसेच नोंदणीसाठी कृषी विभागाकडून जिल्हा संसाधन व्यक्तीमार्फत सहाय्य केले जाणार आहे.

आत्मातील नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प करतेवेळी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेसोबत कृषी पायाभूत योजनेची सांगड घातल्यास अनुदानासोबत तीन टक्के व्याजात सवलत मिळणार आहे.

असा आहे लक्ष्यांक

वैयक्तिक घटकांचे ४३७ लक्षांक प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३९१ लक्षांक साध्य झाले असून लाभार्थींना १३.५० कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात ३९१ उद्योग सुरू करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांनी अर्ज करताना कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटवरील माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT