Agricultural Mechanization  Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Mechanization : सातारा जिल्ह्यातील अवजारांचे एक कोटी ८२ लाखांवर अनुदान रखडले

Subsidy Distribution Stopped : कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत २०२२-२३ साठी सातारा जिल्ह्यतील २३२ लाभार्थी शेतकऱ्यांचे पॉवर टिलर, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे मिळून एकूण एक कोटी ८२ लाख २१ हजार रुपयांचे अनुदान वितरण मागील एक वर्षापासून रखडले आहे.

Team Agrowon

Satara News : कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत २०२२-२३ साठी सातारा जिल्ह्यतील २३२ लाभार्थी शेतकऱ्यांचे पॉवर टिलर, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे मिळून एकूण एक कोटी ८२ लाख २१ हजार रुपयांचे अनुदान वितरण मागील एक वर्षापासून रखडले आहे. महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरणअंतर्गत नवीन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अद्याप मागील अनुदान न आल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे.

कृषी विभागांतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२२ -२३ या आर्थिक वर्षात सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टलवर निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या शेतकऱ्यांना संमती पत्र मिळाल्याने शेतकऱ्यांन ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे,पॉवर टिलर, नांगर, पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, चाफ कटर, रिजर, मळणी यंत्र आदी औजारांची खरेदी केली होती.

यामध्ये जिल्ह्यातील १ हजार ३१६ लाभार्थी शेतकऱ्यांना विविध अवजारांसाठी सात कोटी २१ लाख २५ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना वर्ष उलटले तरी अजून अनुदान जमा न झाल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मजुरांची टंचाई तसेच शेतीला पूरक म्हणून शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतात. बहुतांश शेतकऱ्यांना ही औजारे खरेदी करताना बँका, सोसायटीचे कर्ज घ्यावे लागत असते.

कृषी यांत्रिकीकरण अनुदान प्रलंबित

स्थिती, अनुदान रक्कम लाख रुपये.

तालुका लाभार्थी संख्या अनुदान रक्कम

सातारा ३७ ३१.०९

कोरेगाव १५ १०.८८

खटाव १४ ११.५७

कराड २९ २६.७७

पाटण २८ १९.४३

वाई ११ १९.०७

जावळी २ ०.५६

खंडाळा २९ २७.४३

महाबळेश्वर १ ०.८५

फलटण ८ ५.१५

माण ५८ २९.३६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver : संपूर्ण कर्जमाफी, ऊसाला ४ हजार ५०० रुपयांचा दर, धानाला ३ हजार ५०० हमीभाव, महिलांना दरमहा २ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वासन; अभिनेते विजय यांच्या पक्षाचा जाहीरनामा

Orchard Farmers Support: फळबाग उत्पादकांना आर्थिक आधार

Krishi Seva Kendra: सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Onion Storage Tips: कांदा साठवताना होणाऱ्या चुका टाळा, नुकसान वाचवा

Rural Roads Survey: ग्रामपंचायतीच्या मालकीच्या रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा निर्णय

SCROLL FOR NEXT