Cow Shed Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Cow Shed Subsidy : हिवरेतर्फे नारायणगावात ‘हर घर गोठा’चे अनुदान

Animal Care : केंद्र आणि राज्यसरकारने संयुक्तपणे सुरू केलेल्या ‘हर घर गोठा’ या योजनेंतर्गत जुन्नर तालुक्यात २७ गोठे उभे राहिले आहेत.

Team Agrowon

Pune News : ‘हर घर गोठा, घरघर गोठा’ योजनेत सहभाग घेतलेल्या हिवरेतर्फे नारायणगाव (ता.जुन्नर) येथील शेतकऱ्यांचे मागील १ ते ३ वर्षांपासून प्रलंबित असलेले गोठ्याचे सुमारे सात लाख रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाले आहे.

अनुदानाची रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. केंद्र आणि राज्यसरकारने संयुक्तपणे सुरू केलेल्या ‘हर घर गोठा’ या योजनेंतर्गत जुन्नर तालुक्यात २७ गोठे उभे राहिले आहेत.

मात्र मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना त्याचे अनुदान मिळाले नाही. या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी अनेकवेळा वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. या अनुदानासाठी शेतकरी मनीष मोरडे यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.

मात्र तरीही प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर मोरडे यांनी ९ सप्टेंबर २०२४ रोजी जुन्नर पंचायत समितीच्या आवारात उपोषण देखील केले होते. याबाबत ‘सकाळ’मध्ये ता. २२ सप्टेंबर २०२४ रोजी अनुदानाबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली होती.

ती प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याच्या हालचालींना वेग आला. ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झालेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केल्याची माहिती हिवरेतर्फे नारायणगावचे प्रभारी सरपंच दिगंबर भोर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT