Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Subsidy : अनुदानावरील बियाणे आजपासून मिळणार

Kharif Hangam : खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने अनुदानावर बियाणे वाटपाचा कार्यक्रम निश्‍चित झाला आहे.

Team Agrowon

Amravati News : खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने अनुदानावर बियाणे वाटपाचा कार्यक्रम निश्‍चित झाला आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे ३५ हजार २६० बॅग व तुरीचे ५६८ क्विंटल बियाणे वाटपाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे.

साधारणतः ३ जूनपासून अनुदानावरील बियाण्यांच्या वाटपास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, ३१ हजार २६० शेतकऱ्यांनी अद्यापही या योजनेचा लाभ घेण्यास पुढाकार घेतलेला नाही.

‘महाडीबीटी’ पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सोडतीने हे बियाणे देण्यात येणार असून, शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून परमीट प्राप्त करून घेत कृषी सेवा केंद्रातून उचल करायची आहे. ज्यांची नोंदणी झाली नाही त्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा, असे ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापक संजय देशमुख यांनी सांगितले.

राष्ट्रीय बीज निगम, महाबीज व कृषी संशोधन केंद्राकडून सोयाबीनचे प्रात्यक्षिक व वितरणाचे १०,५७८ क्विंटल (३५,२६० बॅग) बियाणे उपलब्ध झाले आहे. तुरीचे ५६८ क्विंटल, तर मुगाचे २१ व उडदाचे १० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

एका शेतकऱ्यास सोयाबीनची एक बॅग वाटप केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी घाई करण्याचे व तत्काळ परमिटवरील बियाण्यांची उचल करण्याचे आवाहन ‘महाबीज’कडून करण्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १२०० क्विंटलची नोंदणी झाली असून, चार हजार शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.

उद्दिष्टापैकी अजून ९ हजार ३७८ क्विंटलची नोंदणी करण्यात आली नसून, उर्वरित बियाण्यांचा लाभ ३१ हजार २६० शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. मात्र त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नसेल त्यांना तालुका कृषी अधिकाऱ्याकडे अर्ज करून लाभ मिळवता येणार आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांनी पाऊस पडण्याची प्रतीक्षा न करता बियाणे प्राप्त करण्यासाठी घाई करणे आवश्यक आहे.

...मग उडतो गोंधळ

शेतकरी मॉन्सूनचा पाऊस पडल्याशिवाय बियाणे खरेदीला सुरुवात करत नाही, हा दरवर्षीचा अनुभव आहे. पहिला पाऊस पडला, की शेतकऱ्यांची बियाण्यांसाठी बाजारात गर्दी होते. याच धावपळीत ते अनुदानावरील बियाण्यासाठीही गर्दी करतात व अनेकांना मग ते मिळत नाही. त्यामुळे अनुदानावरील बियाण्यांची टंचाई असल्याचीही ओरड सुरू होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

Sericulture Farming : पावसाने इतर पिकं गेली, तुती-रेशीम ठरलं आधार; ४ एकरांतून लाखोंचं उत्पन्न | Agrowon

Veterinary Staff Shortage: राधानगरीत रिक्त पदांमुळे जनावरांच्या उपचारात अडचणी

Rain Deficit Impact: पावसाने केळी लागवडीला ‘ब्रेक’

Akola Farmer Loan Waiver: अकोला जिल्ह्यातील ११ हजार ५० शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT