Gharkul Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Gharkul : दस्त नोंदणीच्या परवानगीचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना

Hingoli Collector : महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.

माणिक रासवे

Hingoli News : महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे.

या अधिसूचनेत ग्रामीण घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्याला कमाल ५०० चौरस फुटापर्यंत हस्तांतरण करण्यासाठी जिल्हाधिकारी मंजुरी देऊ शकतील, असे नमूद आहे.

त्यानुसार अधिकार उपविभागीय अधिकाऱ्याकडे वर्ग करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ३० जानेवारी रोजी काढलेल्या आदेशान्वये दिले आहेत.

वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी घरकुलासाठी एक गुंठा जमीन खरेदी करण्यासाठी अर्जदार उपविभागीय अधिकारी कार्यालयात तगादा करीत आहे. त्यामुळे शासन अधिसूचना १४ जुलै २०२३ मधील जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रदान करावेत, अशी विनंती केली होती.

त्यानुसार महसूल व वन विभागाकडील अधिसूचना १४ जुलै २०२३ (२ घ) (ख) नुसार जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार हिंगोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी अधिसूचनेतील तरतुदी आणि नियमात विहित केलेल्या शर्तीस अधीन राहून वर्ग करीत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Shortage Issue: वरकुटे खुर्द, सराफवाडी पाझर तलाव कोरडा

20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा

PDCC Bank Support: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्व पातळ्यांवर पुढाकार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

Agriculture Officer Suspended: चुकीच्या मूल्यांकनप्रकरणी कृषी अधिकारी निलंबित

Bharati Plant: जुन्नरमध्ये दुर्लक्षित वनस्पतीला ‘भारती’ नावाने मिळाली ओळख

SCROLL FOR NEXT