Crop Damage Flood Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : उत्पन्नाधारित पीक भाव संरक्षण विमा योजनेसाठी अभ्यास गट

Crop Price Protection : सध्या सध्या अस्तित्वात असलेल्या प्रधानमंत्री कृषी पीकविमा योजनेची व्याप्ती वाढवून शेतकरी बांधवांना पीक भाव संरक्षण देण्याचा दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.

Team Agrowon

Dharashiv News : सध्या सध्या अस्तित्वात असलेल्या प्रधानमंत्री कृषी पीकविमा योजनेची व्याप्ती वाढवून शेतकरी बांधवांना पीक भाव संरक्षण देण्याचा दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. जगातील काही देशांप्रमाणे आपणही शेतमालाला पीक विमा योजनेच्या माध्यमातून भावाचे संरक्षण देणे आवश्यक आहे.

त्यासाठी उत्पन्नाधारित पीक भाव संरक्षण विमा योजना सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी या योजनेसाठी अभ्यास गट गठित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे एका महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक प्रक्रियेच्या दिशेने सुरू केलेल्या प्रयत्नास पाठबळ मिळाल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.जगभरातील काही देशात उत्पन्नावर आधारित पीक भाव संरक्षण दिले जाते.

त्यामुळे शेतीमालाला योग्य भाव मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी अगदी सहजपणे पूर्णत्वास जाऊ शकते. शासनाच्या माध्यमातून उत्पन्नावर आधारित पीक भाव संरक्षण विमा योजना सुरू करण्यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभ्यासगट गठित करून योजनेसाठी आवश्यक मसुदा तयार करणे गरजेचे आहे.

त्यासाठी संबंधित विभागाला आदेशित करावे, अशी मागणी केल्यानंतर योजनेसाठी अभ्यास गट नेमून त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली. ही योजना उत्पादनावर आधारित नुकसान भरपाईची आहे.

मात्र योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. बाजार भावातील घटीमुळे नुकसान होऊ नये, यासाठी पीक भाव संरक्षण योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जागतिक बाजारपेठेमुळे अनेकदा शेतीमालाचे भाव कोसळतात, परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ही बाब नव्या योजनेमुळे टाळेल, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT