Agriculture Student Protest Agrowon
ॲग्रो विशेष

MPKV Rahuri : रिक्त पदे भरा; अन्यथा तीव्र आंदोलन करू

Agriculture Student Protest : राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील रिक्त जागा तातडीने भराव्यात यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १८) महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील रिक्त जागा तातडीने भराव्यात यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १८) महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला. लवकर रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी अन्यथा सर्व कृषी पदवीधर, पदव्युत्तर पदवीधर व आचार्य पदवीधर विद्यार्थी तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कर्मचारी भरती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. चारही कृषी विद्यापीठातून दरवर्षी आचार्य पदवीचे २५४, पदव्युत्तर पदवीचे १३८८ आणि पदवी चे १७९१० असे एकूण १९ हजार ५५२ विद्यार्थी पदवी प्राप्त करून बाहेर पडतात. कृषी क्षेत्रामध्ये उच्च शिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना विद्यापीठ हे एकमेव नोकरीचे दालन असल्याने विद्यार्थी संशोधन कार्याशी निगडित काम करतांना दिसतात. या सर्व गोष्टींचा परिणाम कृषी संशोधनावर होत आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन कार्यासाठी अत्यावश्यक अशा सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक यांच्या रिक्त पदांची संख्या ६०-७० टक्क्यांवर पोहचली आहे.

या पार्श्वभूमीवर चारही कृषी विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक ही पदे तातडीने भरावीत या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून मागण्याचे निवेदन कुलगुरूंना दिले.

विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रमुख मागण्या

- रिक्त पदांबाबतचा आकृतिबंध लवकर कृषी परिषदेस सादर करावेत.

- कृषी परिषदेने चारही सर्व रिक्त पदांचा आकृतिबंध लवकरात लवकर कृषी मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांस सादर करावेत.

- सहाय्यक प्राध्यापक पदाच्या शैक्षणिक अहर्तेबाबत आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय कृषी परिषदेस त्वरित सादर करावेत.

- चारही कृषी विद्यापीठांनी रिक्त पदांबाबतच्या सर्व शैक्षणिक अर्हता, नियम व अटी पदभारतीच्या अगोदर स्पष्ट कराव्यात.

- चारही कृषी विद्यापीठांनी रिक्त पदांची आकडेवारी जाहीर करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT