Vineyard  Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : द्राक्ष बागा टिकविण्याची धडपड

Vineyard Management : लातूर जिल्ह्यातून दरवर्षी द्राक्षाची निर्यात केली जाते. याही वर्षी निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

हरी तुगावकर

Latur News : लातूर जिल्ह्यातून दरवर्षी द्राक्षाची निर्यात केली जाते. याही वर्षी निर्यातक्षम द्राक्ष तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढीच्या काळातच द्राक्ष बागा अडचणीत आल्या आहेत.

त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून अधिकची काळजी घेतली जात आहे. रोग पडू नये म्हणून वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणी करून बागा टिकवण्याची धडपड सध्या सुरू आहे.

जिल्ह्यात सध्या वातावरणात बदल झाला आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून तर धुके, पाऊस पडत आहे. याचा परिणाम द्राक्षावर करपा, डाऊनीसारखा रोग पडण्याची भीती आहे. रोग पडला तर द्राक्षाचे मोठे नुकसान होते. हे लक्षात घेऊन द्राक्ष उत्पादक शेतकरी बदलत्या हवामानाचा सामना करण्याकरिता द्राक्षावर कीटकनाशकांची फवारणी करून बागांचे संरक्षण करीत आहेत.

निर्यातक्षम द्राक्षावर भर

जिल्ह्यात सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा उभ्या आहेत. यात किमान १५० हेक्टर क्षेत्र निर्यातक्षम द्राक्षाचे आहे. यात औसा तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनासाठी खूप काळजी घ्यावी लागते. द्राक्षाच्या मन्यावर थोडा जरी परिणाम झाला तर ते रिजेक्ट केले जातात. त्यामुळे अशा बागावर शेतकऱ्यांचे अधिक लक्ष दिसून येत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. याचा परिणाम फळ बागांवर होण्याची शक्यता आहे. त्यात द्राक्षावर अधिक परिणाम होऊ शकतो. या वर्षी जिल्ह्यात १५० हेक्टरवरील निर्यातक्षम बागाची नोंदणी अपेक्षित आहे. सध्या त्याची नोंदणीही सुरू आहे. अशा वातावरणात करपा, डाऊनीसारखा रोग पडू शकतो. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी फवारणी करण्याची गरज आहे.
- शिवसांब लाडके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर
जिल्ह्यात सध्या द्राक्ष बागा एक महिन्याच्या झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वातावरणातील बदलामुळे द्राक्ष बागावर रोग पडण्याची भीती आहे. त्यामुळे बागा टिकविण्यासाठी द्राक्ष उत्पादकांना अधिकची काळजी घ्यावी लागत आहे. रोग पडू नये म्हणून फवारणी करावी लागत आहे.
- शिवाजीराव सोनवणे, अध्यक्ष, जिल्हा द्राक्ष उत्पादक संघ, लातूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT