Chandoli Project agrowon
ॲग्रो विशेष

Chandoli Project : चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या लढ्याला यश, ३ महिन्यात जमिनी मिळणार

Chandoli People Land : अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यांना तातडीने दाखले हवे आहेत त्यांची नावे द्या, त्यांना एका दिवसांत दाखले देतो असे सांगितले.

sandeep Shirguppe

Bharat Pathankar : चांदोली प्रकल्पग्रस्तांना २१५ हेक्टर जमीन ३ महिन्यांत देण्यात येईल, उर्वरित ३१८ हेक्टर जमीन पुढील ६ महिन्यांनंतर देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

दरम्यान, अन्य मागण्यांना मंत्रालयातून जोपर्यंत मंजुरी येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, शिवाय २७ फेब्रुवारीनंतर केव्हाही आम्ही मूळ गावी प्रयाण करण्याचा इशाराही डॉ. पाटणकर यांनी दिला.

प्रकल्पग्रस्तांतर्फे वनविभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी येडगे यांच्यासमवेत बैठक झाली. प्रकल्पग्रस्तांचे समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय झाला.

बैठकीत डॉ. पाटणकर यांनी जमीन वाटप, घरकुल अनुदान, पुनर्वसित वसाहतीत सुविधा देण्याच्या मागण्या मांडल्या. घरबांधणी अनुदान, लाभक्षेत्रातील जमीन वाटप व प्रकल्पग्रस्त दाखले याविषयी मंत्रालयातून स्पष्टीकरण मागविल्याचे पुनर्वसन अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यांना तातडीने दाखले हवे आहेत त्यांची नावे द्या, त्यांना एका दिवसांत दाखले देतो असे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT