Dr. Indra Mani Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : सेंद्रिय शेतीचे क्षेत्र १ लाख हेक्टरपर्यंत विस्तारण्यासाठी प्रयत्न करा

Dr. Indra Mani : सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरुकता वाढवत आगमी काळात टप्प्याटप्प्याने सेंद्रिय शेतीखालील क्षेत्राचा विस्तार १ लाख हेक्टरपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी शनिवारी (ता.१७) केले.

Team Agrowon

Parbhani News : मातीच्या आरोग्यावरच मानव, वनस्पती, पशुपक्षी यांचे आरोग्य अवलंबून आहे. या सर्व घटकांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी सेंद्रिय शेती हा पर्याय आहे. सेंद्रिय शेतीबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरुकता वाढवत आगमी काळात टप्प्याटप्प्याने सेंद्रिय शेतीखालील क्षेत्राचा विस्तार १ लाख हेक्टरपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी शनिवारी (ता.१७) केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे आयोजित पाचदिवसीय सेंद्रिय शेती प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी शनिवारी (ता. १७) झाला. या वेळी कुलुगुरू डॉ. इंद्र मणी दूरदृश्‍य प्रणालीद्वारे बोलत होते.

संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, कृषिभूषण सूर्यकांतराव देशमुख झरीकर, कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे मुख्य संशोधक डॉ. आनंद गोरे, डॉ. पपिता गौरखडे, प्रा. प्रीतम भुतडा, भूषण निकम, इरफान शेख आदी उपस्थित होते.

डॉ. वासकर म्हणाले, की सेंद्रिय शेतीची सुरुवात छोट्या क्षेत्रावर करावी. बाजारपेठेचा अंदाज घेऊन सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे. प्रमाणीकरण केल्यानंतर सेंद्रिय शेतीमालाच्या विक्रीसाठी संघटनात्मकरीत्या बाजारपेठ काबीज करणे आवश्यक आहे. कृषिभूषण देशमुख म्हणाले,

की माती जिवंत ठेवण्यासाठी, समाजाला रसायन अवशेषमुक्त शेतीमाल देण्यासाठी शेतकऱ्यांनी गटाने एकत्र येऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती करावी. निकम म्हणाले, की सेंद्रिय शेतीमाल उत्पादनासोबत मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया उद्योगाची उभारणी आवश्यक आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत ते शक्य आहे. या वेळी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी यात सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT