Abdul Sattar Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : बोगस विमा भरणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करणार: कृषिमंत्री सत्तार

भाजपचे आ. संतोष दानवे यांनीही पीक विम्यातील घोटाळ्याचे प्रकार जालना जिल्ह्यात वाढत असल्याचे सांगितले.

Team Agrowon

Crop Insurance Company : पीक विम्यात मोठ्याप्रमाणावर घोटाळा होत आहे, असा प्रश्न कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विधानसभेत उपस्थित केला. राज्यात ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला नाही, अशा शेतकऱ्यांच्या नावावर विमा भरला जात नसून त्याचा फायदा उचलणारी टोळी सक्रिय झाली आहे. या टोळीवर कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी केली.

भाजपचे आ. संतोष दानवे यांनीही पीक विम्यातील घोटाळ्याचे प्रकार जालना जिल्ह्यात वाढत असल्याचे सांगितले. तसेच संबंधित कंपनी, बँक अधिकारी आणि टोळीवर कारवाई करण्याची मागणी केली.

या लक्ष्यवेधीवर उत्तर देताना कृषिमंत्री सत्तार म्हणाले, "बोगस पीक विम्याचा हप्ता भरून विमा उचलणाऱ्या टोळीवर कडक कारवाई करू. डेटा कुणी लिक केला, यासंबंधित कारवाईचे आदेश कृषी आयुक्तांनी दिले आहेत. त्याचा तपास सुरू आहे.

राज्यात ७ हजार २६५ शेतकऱ्यांच्या नावावर बोगस विमा उचलण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. यामध्ये दोषी असणाऱ्यावर कडक कारवाई करू."

राज्यात ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कमी क्षेत्र आहे, अशा शेतकऱ्यांनी विमा भरला नाही तर त्यांच्या नावावर विमा भरून लाभ घेतला जात आहे. जमिनीची बोगस भाडेपट्टा दाखवून असा घोटाळा केल्याचे प्रकार राज्यभर उघडकीस आले आहेत.

"बोगस पीक विम्या भरणाऱ्यावर कडक कारवाई करू. विमा कंपन्या यामध्ये दोषी अढळल्या तर केंद्र सरकारला विंनती करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देऊ." असेही सत्तारांनी सांगितले.

दरम्यान, पीक विमा कंपनीच्या सावळ्या गोंधळात शेतकरी विम्यापासून वंचित राहत असल्याचे प्रकार राज्यभर घडत आहेत.

बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अलीकडेच शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपन्यांनी भरपाई म्हणून ६०-६५ रुपये जमा केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे विमा कंपनीच्या कारभाराला चाप लावण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT