Crop Residue Burning Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Residue Burning: मध्य प्रदेशात पीक अवशेष जाळल्यास होणार कारवाई

Legal Action: पिकाचे अवशेष जाळल्यामुळे प्रदूषणात वाढीसोबतच पर्यावरणालाही धोका संभवतो. याची दखल घेत खंडवा (मध्य प्रदेश) जिल्हा प्रशासनाने पीक अवशेष जाळणाऱ्यांविरोधात कडक कारवाईसाठी पावले उचलली आहेत.

Team Agrowon

Nagpur News: पिकाचे अवशेष जाळल्यामुळे प्रदूषणात वाढीसोबतच पर्यावरणालाही धोका संभवतो. याची दखल घेत खंडवा (मध्य प्रदेश) जिल्हा प्रशासनाने पीक अवशेष जाळणाऱ्यांविरोधात कडक कारवाईसाठी पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत दोन एकरांसाठी २५०० रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. अशा प्रकरणात निरीक्षणाची जबाबदारी ग्रामसेवकांवर सोपविण्यात आली आहे.

राष्ट्रीय हरित प्राधिकरणाच्या नियमांचा हवाला देत खंडवा येथील अतिरिक्‍त जिल्हा अधिकारी काशीराम बडोले यांनी या संदर्भातील अधिसूचना काढली आहे. त्यानुसार, व्यक्‍ती अथवा संस्था ज्यांच्याकडे दोन एकरांपर्यंत जमीन आहे.

त्यांनी शेतातील पिकाचे अवशेष जाळल्यास त्यांच्याकडून पर्यावरणाची हानी म्हणून २५०० रुपयांची वसुली केली जाणार आहे. ज्यांच्याकडे पाच एकरांपर्यंत जमीन आहे. त्यांच्याकडून पाच हजार, तर पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या व्यक्‍तीने पीक अवशेष जाळल्यास त्यांच्याकडून १५ हजारप्रमाणे दंडात्मक र‍कमेची वसुली केली जाणार आहे.

या संदर्भातील कारवाईसाठी ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होताच महसूल अधिकाऱ्यांच्या समन्वय समितीद्वारे कारवाईबाबतचे धोरण ठरणार आहे.

पर्यावरण रक्षणासाठी पाऊल

पीक अवशेष जाळल्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहचते सोबतच प्रदूषणात वाढ होत मानवी आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. पर्यावरणातील पशुपक्ष्यांचे जीवनही असुरक्षित होते. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT