Collector Jitendra Dudi Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage Plan : पाणीसाठा वाढविण्यासाठी आराखडा सादर करा

District Collector Jitendra Dudi : जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ ची अंमलबजावणी जलदगतीने करण्यात यावी. तसेच २०२५-२६ च्या प्रारूप आराखड्यात जिल्ह्यात पाणीसाठा वाढीसाठी पाझर तलाव दुरुस्ती व गाळ काढण्याबाबतचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: जिल्हा नियोजन समितीअंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ ची अंमलबजावणी जलदगतीने करण्यात यावी. तसेच २०२५-२६ च्या प्रारूप आराखड्यात जिल्ह्यात पाणीसाठा वाढीसाठी पाझर तलाव दुरुस्ती व गाळ काढण्याबाबतचा सविस्तर आराखडा सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

येत्या २०२५- २६ च्या प्रारूप आराखड्यातील तरतुदींच्या अनुषंगाने यंत्रणांचा आढावा घेऊन विविध सूचना सोमवारी (ता.२०) केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, की सिंचनासाठी नदी, कालवे आदी सुविधा उपलब्ध नसलेल्या गावातील लघू तलाव दुरुस्तीसाठी निधीचे प्रस्ताव सादर करावेत. त्या अनुषंगाने सविस्तर प्रस्ताव सादर करून किती तलावांच्या भिंतींची दुरुस्ती व गाळ काढल्यास किती पाणीसाठा निर्माण होईल आणि त्यासाठी किती खर्चाची आवश्यकता आहे, याचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे सांगितले.

जिल्ह्यात स्मार्ट प्राथमिक शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र संकल्पनेअंतर्गत ३०५ प्राथमिक शाळा आणि सर्व १०८ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास करण्यात येणार आहे. इमारती जुन्या झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती, नवीन बांधकाम करण्यात येणार आहे. महाऊर्जाने या सर्व स्मार्ट प्राथमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता सौर पॅनेलची योजना राबवून नेट मिटरिंग करावे, जेणेकरून त्यांच्या विजेचा खर्च वाचण्यासह आर्थिक लाभही होऊ शकेल.

पर्यावरणीय पर्यटन (इको टुरिझम) विकासाला वन्यजीव वनक्षेत्रात चांगला वाव असून त्याचा प्रस्ताव वनविभागाने सादर करावा. रेशीम विकास विभागाने समूह विकासांतर्गत मलबेरीच्या लागवडीच्या अनुषंगाने प्रोत्साहन द्यावे.

त्यासाठी शेतकरी उत्पादक संघांना रेशीम धागे तयार करण्याचे प्रशिक्षण देण्याचे तसेच किमान ५ हजार शेतकऱ्यांना मलबेरी लागवडीसाठी अर्थसहाय्याचा आराखडा सादर करावा. सन २०२४-२५ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांतर्गत योजनांच्या भौतिक व आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief: मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून तातडीने मदत द्या

Exam Stress Relief : परीक्षा जवळ आलीये अन् टेन्शन वाढलंय? 'या' सोप्या टिप्सने ताण होईल छुमंतर!

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

SCROLL FOR NEXT