Straight Cotton Variety Agrowon
ॲग्रो विशेष

Straight Cotton Variety : सरळ कापूस वाण यंदाही अल्प

Cotton Variety : शेतकऱ्यांची होणार वणवण; नाइलाजाने धरतात परराज्यांची वाट

Team Agrowon

Cotton Crop : खानदेशात सरळ किंवा देशी सुधारित, देशी संकरित कापूस वाणांची लागवड बऱ्यापैकी होते. परंतु हे वाण हवे तेवढे व हव्या त्या कंपनीकडून उपलब्ध होत नसल्याने त्यांचा यंदाही तुटवडा असणार आहे.

कापूस लागवडीत खानदेश अग्रेसर आहे. पूर्वहंगामी किंवा बागायती कापसाची सुमारे दोन लाख हेक्टरवर खानदेशात लागवड होते. तर एकूण लागवड साडेआठ लाख हेक्टर एवढी असते. यात खानदेशात बेवडसाठी तापी, गिरणा,अनेर पट्ट्यात देशी किंवा सरळ कापूस वाणांची लागवड केली जाते.

परंतु मागील तीन-चार वर्षे दर्जेदार व मुबलक प्रमाणात सरळ वाण उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. या वाणांसाठी शेतकरी मध्य प्रदेश, गुजरातची वाट नाइलाजाने धरतात. यंदाही तशीच स्थिती असणार आहे.

कारण यंदाही सरळ वाणांचा पुरवठा किती व कसा, केव्हा होईल, याचा कुठलाही आराखडा, नियोजन कृषी विभागाकडे नाही. कृषी यंत्रणांच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे कापूस उत्पादकांसमोर सतत अडचणी येत आहेत.

खानदेशात सुमारे ४३ लाख कापूस बियाणे पाकिटांची गरज कापूस लागवडीसाठी आहे. यात एकट्या जळगाव जिल्ह्यात २७ लाखांवर कापूस बियाणे पाकिटांचा पुरवठा होणार आहे. कापूस बियाण्याचा ९९ टक्क्यांवर पुरवठा खासगी कंपन्या, पुरवठादार करतात. या बियाण्यासाठी खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते.

यात ९८ ते ९९ टक्के कापूस बियाणे बीटी (बोलगार्ड २) प्रकारातील असते. यात देशी कापूस बियाणे अल्प येते. त्यातही दर्जेदार सरळ किंवा देशी वाण उपलब्ध होत नाही. मागील हंगामात एका कंपनीने राज्यात किंवा खानदेशात आपले सरळ कापूस वाण उपलब्ध होणार नाहीत, बीजोत्पादन कार्यक्रमाचे नुकसान झाले होते, असे म्हटले होते.

कृषी केंद्रांत २० मे पर्यंत हवा पुरवठा
यंदाही खानदेशात २० हजार पाकिटेदेखील सरळ वाणांचा पुरवठा होणार नसल्याची स्थिती आहे. खानदेशात किमान पाच ते सहा लाख पाकिटे एवढी दर्जेदार सरळ कापूस वाणांची मागणी आहे. परंतु पुरवठा होत नाही. काही कंपन्यांचे सरळ वाण जूनच्या मध्यात येतात. या वाणांची गरज बागायती पट्ट्यात असल्याने त्यांचा पुरवठा २० मेपर्यंत कृषी केंद्रांत व्हायला हवा, असाही मुद्दा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT