Shaktipeeth Highway Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांचा आक्रोश! शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन त्वरित थांबवा

Land Acquisition : शक्तिपीठ महामार्गाची परभणी जिल्ह्यातील लांबी ७१ किलोमीटर आहे. पूर्णा, परभणी, सोनपेठ या ३ तालुक्यांतील ३१ गावांतील सुमारे ७३३ हेक्टर भूसंपादन प्रस्तावित आहे.

Team Agrowon

Parbhani News : नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग रद्द करण्यात यावा किंवा परभणी जिल्ह्यातून हा महामार्ग वगळण्यात यावा, या मागणीसाठी मराठवाडा शक्तिपीठ महामार्गविरोधी कृती समितीतर्फे शुक्रवारी (ता. ३१) कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या महामार्गासाठीची भूसंपादन प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

शक्तिपीठ महामार्गाची परभणी जिल्ह्यातील लांबी ७१ किलोमीटर आहे. पूर्णा, परभणी, सोनपेठ या ३ तालुक्यांतील ३१ गावांतील सुमारे ७३३ हेक्टर भूसंपादन प्रस्तावित आहे. हा महामार्ग जात असलेली बहुतांश गावे सिद्धेश्वर, जायकवाडी, माजलगाव या मोठ्या प्रकल्पांच्या कालव्यांच्या लाभक्षेत्रातील आहेत.

सुपीक जमिनीचे अधिग्रहण केल्यानंतर अनेक शेतकरी कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे या महामार्गाची भूसंपादन प्रक्रिया तत्काळ थांबविण्यात यावी. नागपूर-गावा शक्तिरपीठ महामार्ग रद्द करावा अथवा परभणी जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग वगळावा, अशी मागणी या वेळी आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.

मराठवाडा शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये गोविंद घाटोळ, केशव हजारे, गजनन देशमुख, शेख रहिम, नामदेव आडे, महादेव चांगभले, सुनील बेले आदींसह विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

Crop Damage Compensation: कोकणातील १ लाख ३४ हजार शेतकऱ्यांना दिलासा; २०९ कोटी मदत मंजूर, शासन निर्णय जारी

Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT