CM Eknath Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input Center : कृषी निविष्‍ठा विक्री केंद्राबाहेर साठाफलक, भावफलक लावावा

Agriculture Update : बियाणे, खते व निविष्‍ठाचा पुरवठा, जादा दराने विक्री तसेच खते व बियाणे या निविष्‍ठांच्‍या लिंकींगबाबत कृषी विभागास सतर्क राहण्‍याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

Team Agrowon

Washim News : वाशीम जिल्‍‍ह्यात खरीप हंगामाची सुरुवात झालेली असून, बी-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक इत्‍यादी निविष्‍ठा खरेदी करण्‍यासाठी शेतकऱ्यांची रेलचेल दिसून येत आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ११ जून रोजी खरीप हंगाम पुर्वनियोजन आढावा सभा झाली.

या सभेत बियाणे, खते व निविष्‍ठाचा पुरवठा, जादा दराने विक्री तसेच खते व बियाणे या निविष्‍ठांच्‍या लिंकींगबाबत कृषी विभागास सतर्क राहण्‍याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. जिल्ह्यात कृषी विभागाने काही ठिकाणी केंद्रावर कारवाई केली आहे.

जिल्ह्यात कार्यरत सर्व कृषी निविष्‍ठा विक्री केंद्राबाहेर कृषी केंद्रामध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या कृषी निविष्‍ठा बियाणे, खते, कीटकनाशके यांचा अद्यावतसाठा व भावफलक तसेच शेतकऱ्यांच्‍या तक्रारीसाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००-२३३-४००० व ९८२२४४६६५५ हा व्‍हॉटसॲप नंबर कृषी केंद्राबाहेर प्रदर्शित करून सर्वांना दिसेल, अशा ठिकाणी लावावा, असे आवाहन जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शाह यांनी केले आहे.

...असे आहेत संपर्क अधिकारी

एस. टी. धनुडे (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, वाशीम) मो. ९३२५८००७५१,

अरुण मुंदडा (वाशीम व रिसोड )............मोबा. ८६६८२०६७९४

संतोष गिरी (मालेगाव)...................... मोबा. ७९७२४३१५५१

सी. पी. भागडे (वाशीम).................... मोबा. ८८०५८१०५१८

संदीप सावळे (मंगरुळपीर).................. मोबा. ७५८८५०२५९५

आकाश इंगोले (वाशीम).................... मोबा. ९५७९७३८४५२

डी. एस. मकासरे (मानोरा).................. मोबा. ९९२१४७३९५५,

अनिल राठोड (कारंजा) ..................... मो. ७५८८५०२५९५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT