Sangli DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Sangli DCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेच्या चौकशीवरील स्थगिती उठणार

Cooperative Bank : बॅँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या कथीत गैरकारभाराच्या तक्रारीवर चाचणी लेखापरीक्षण करण्यात आले. त्यानंतर बॅँकेची कलम ८३ अंतर्गत चौकशी झाली.

Team Agrowon

Sangli News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या काही विद्यमान संचालकांसह माजी संचालकांची कलम ८८ अंतर्गत चौकशी सुरू आहे. या चौकशीला मागील सरकारमधील सहकारमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठण्याचे संकेत आहेत.

याप्रकरणी ४ जून रोजी विद्यमान सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर अंतिम सुनावणी होणार आहे. मंत्री पाटील यांनी अधिवेशानात या चौकशीवरील स्थगिती उठवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. ती उठवली जाणार का? याकडे आता लक्ष लागले आहे.

बॅँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या कथीत गैरकारभाराच्या तक्रारीवर चाचणी लेखापरीक्षण करण्यात आले. त्यानंतर बॅँकेची कलम ८३ अंतर्गत चौकशी झाली. या चौकशीतही तक्रारदारांनी केलेल्या काही आरोपांत तथ्य आढळले आहे. बॅँकेचे सुमारे ५० कोटी ५८ लाखांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नुकसानीची जबादारी निश्चित करून वसुली करण्यासाठी सहकार अधिनियमातील कलम ८८ अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी सुरू होताच या विरोधात माजी संचालकांनी तत्कालीन सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे अपील केले. वळसे-पाटील यांनी चौकशीला स्थगिती दिली. वर्ष-दीड वर्ष स्थगिती कायम आहे.

या चौकशीवरील स्थगिती उठवण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी वारंवार विधिमंडळात आवाज उठवला. सहकार मंत्री पाटील यांनी चौकशीवरील स्थगिती उठवणार असल्याचे गेल्या अधिवेशानात जाहीर केले.

मात्र अद्याप स्थगिती उठवली नव्हती. याप्रकरणी आता माजी संचालकांनी केलेल्या अपीलावर ४ जून रोजी सहकारमंत्र्यांसमोर अंतिम सुनावणी होणार आहे. या वेळी सदर चौकशीवरील स्थगिती उठवण्यात येईल, असे संकेत आहेत. सहकारमंत्र्यांनी स्थगिती उठवली तर बॅंकेचे माजी संचालक व काही विद्यमान संचालक चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT