Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : रब्बीची राज्यस्तरीय आढावा बैठक मंगळवारी पुण्यात

Rabi Season Review Meeting : राज्यातील रब्बी हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेणारी वार्षिक बैठक येत्या मंगळवारी (ता.१७) पुण्यात होणार आहे.

मनोज कापडे

Pune News : राज्यातील रब्बी हंगामाच्या नियोजनाचा आढावा घेणारी वार्षिक बैठक येत्या मंगळवारी (ता.१७) पुण्यात होणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह कृषी खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहकार आयुक्त अनिल कवडे सहभागी होत आहेत.

साखर आयुक्तालयातील साखर संकुलमधील चौथ्या मजल्यावर सकाळी ११ वाजता ही बैठक होईल. त्यानंतर दुपारी दीड वाजता कृषिमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

राज्याचा खरीप हंगाम संकटात आहे. २४ जिल्ह्यांच्या शेकडो मंडलांमधील पिके वाया गेली आहेत. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे तसेच परतीचा पाऊस चांगला न झाल्याने राज्यातील जलाशये पूर्ण भरलेली नाहीत. त्यामुळे रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात कृषी विभागाची कसोटी लागेल.

कृषी आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांनी अलीकडेच या बैठकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. ‘पोकरा’चे व्यवस्थापकीय संचालक परिमल सिंह, ‘स्मार्ट’चे प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्री, महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीसाठी निमंत्रित केले आहे.

कृषी विभागाच्या नियोजनानुसार यंदा रब्बी हंगामाचा पेरा ५४ लाखांवरून ५९ लाख हेक्टरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. पौष्टिक तृणधान्य वर्षामुळे ज्वारीचा तर चाऱ्याची मागणी विचारात घेत मका पिकाचा पेरा वाढविला जाणार आहे. मात्र, उद्दिष्टांच्या बाजूंमध्ये कडधान्य व गहू पिकाचे क्षेत्र ‘जैसे थे’ ठेवले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

Drip Irrigation Subsidy: ठिबक सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, दुसऱ्या टप्प्यात २०६ कोटी निधी मंजूर

Cocopeat Sterilization: कोकोपीटचे निर्जंतुकीकरण करताना...

SCROLL FOR NEXT