Agriculture Exhibition Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Exhibition : अकोल्यात आजपासून राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन..

Agricultural Festival : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीदिनानिमित्त कृषी विद्यापीठ परिसरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (ता.२७) या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

Team Agrowon

Akola News : डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीदिनानिमित्त कृषी विद्यापीठ परिसरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज (ता.२७) या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे., उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (ता. २७) ते शुक्रवार (ता. २९) या कालावधीत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सव व चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. आज सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.

राज्यस्तरीय प्रदर्शन, कृषी महोत्सव व चर्चासत्रे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली होतील. या प्रदर्शनामध्ये फळबाग, भाजीपाला, फुलशेती व वनौषधी, कापूस, ज्वारी, गहू, कडधान्य, तेलबिया, पाणलोट विकास, पशू संवर्धन व दुग्ध व्यवसाय, कृषी अभियांत्रिकी व अवजारे इत्यादी विभागांसह कृषी विभाग, इतर कृषी विद्यापीठे, संलग्न कृषी संस्था व शासनाच्या इतर विभागांची दालने राहतील.

प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

शेतकरी, युवक - युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, जिल्हाधिकारी तथा ‘आत्मा’ समितीचे अध्यक्ष अजित कुंभार, विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे व डॉ. राजेंद्र साबळे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT