Maharashtra Agriculture Awards Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Awards Ceremony : महाराष्ट्र शासनातर्फे २९ सप्टेंबरला राज्यस्तरीय कृषी पुरस्कार सोहळा!

Award Distribution : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते रविवार (ता.२९) राज्य शासनातर्फे सन २०२० ते २०२३ या वर्षीच्या ४४८ पुरस्कार्थींचा पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम होणार आहे.

Roshan Talape

Pune News : राज्य शासनातर्फे सन २०२० ते २०२३ या वर्षीच्या ४४८ पुरस्कार्थींचा पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. ९ विभांगामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी आणि कर्मचारी यांना हे कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यात कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. शेतीमधील उत्पादकता आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना राज्य शासनाकडून पुरस्कार दिले जातात. हा कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते रविवार (ता.२९) ला नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया (डोम), वरळी मुंबई येथे हा कार्यक्रम होणार आहे.

कृषी उत्पादन आणि उत्पादन वाढीमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या बहुमोल कार्यासाठी गौरवित केले जाणार आहे. हे पुरस्कार राज्यातील कृषी विस्तारात विशेष योगदान देणाऱ्यांचा सन्मान म्हणून दिला जातो, ज्यामुळे नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होण्यास मदत होते.

या पुरस्कार समारंभाला राज्यभरातील शेतकरी, अधिकारी, कृषी क्षेत्रातील तज्ञ आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याचा उद्देश शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणे, तसेच राज्यातील शेती क्षेत्रात सकारात्मक बदल घडवणे हा आहे.

कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची माहिती

१) डॉ. पंजाबराव देशमुख कषीरत्न पुरस्कार

राज्यातील एका शेतकऱ्यास किंवा संस्थेस हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार प्राप्त्याला ३ लाख रुपये रोख रक्कमेचे पारितोषिक, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्राचा समावेश करुन सन्मानित करण्यात येणार आहे.

२) वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार

शेतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रात अद्वितीय काम करणाऱ्या ८ शेतकऱ्यांना किंवा संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारात २ लाख रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्राचा समावेश असणार आहे.

३) जिजामाता कृषिभूषण पुरस्कार

कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला शेतकरी यांना उत्कृष्ट कृषी कार्यासाठी दिला जाणारा हा प्रतिष्ठित पुरस्कार आहे. हा पुरस्कार एकूण ८ महिलांना देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी २ लाख रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्राचा समावेश करुन सन्मानित करण्यात येणार आहे.

४) कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार

रासायनिक मुक्त शेती, पर्यावरणपूरक शेती पद्धती, जैवविविधतेचे संवर्धन, आणि नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर अशा अनेक क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव या पुरस्काराने केला जातो. यात २ लाख रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्राचा समावेश करुन सन्मानित करण्यात येणार आहे.

५) वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

महाराष्ट्रातील शेतकरी, व्यक्ती किंवा संस्थांना उत्कृष्ट कामगिरी असणाऱ्या ८ शेतकऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत. या पुरस्कारात १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्राचा समावेश करुन सन्मानित करण्यात येणार आहे.

६) उद्यान पंडित पुरस्कार

राज्यातील फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ८ शेतकऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात १ लाखांची रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्राचा समावेश करुन सन्मानित करण्यात येणार आहे.

७) वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

कृषी विभागाकडून ४० शेतकऱ्यांना या पुरस्कारातर्फे सन्मानित करण्यात येणार आहे. यात ४४ हजार रोख रक्कम स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्राचा समावेश करुन सन्मानित करण्यात येते.

८) पद्मश्री डॅा विठ्ठलराव विखे पाटील, कृषी सेवारत्न पुरस्कार

कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना राज्यशासनाद्वारे या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यात एकूण १० पुरस्कार्थीना या पुरस्काराने सन्मानित करतात.

९) युवा शेतकरी पुरस्कार

वय १८ ते ४० असणाऱ्यांसाठी या पुरस्काराचे वितरण होते. यात १ लाख २० हजार रोख रक्कम तर त्यासोबत स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्राचा समावेश करुन सन्मानित करण्यात येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT