Manikrao Kokate Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Protection Bag : फळांच्या प्रोटेक्शन बॅगसाठी अनुदान देणार

Agriculture Subsidy : कृषिमंत्री कोकाटे हे नुकतेच अरण येथे आले होते. येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी शरद व सावता या दोन नव्या आंब्याच्या जाती विकसित केल्या आहेत, त्याला पेटंटही मिळाले आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या फळाची गुणवत्ता सुधारावी, त्याचे संरक्षण व्हावे, यासाठी फळाच्या प्रोटेक्शन बॅगसाठी राज्य सरकार अनुदान देणार असल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अरण (ता. माढा) येथे दिली.

कृषिमंत्री कोकाटे हे नुकतेच अरण येथे आले होते. येथील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी शरद व सावता या दोन नव्या आंब्याच्या जाती विकसित केल्या आहेत, त्याला पेटंटही मिळाले आहे. या फळबागेची त्यांनी पाहणी केली. त्यांनी एकाच आंब्याच्या झाडाला सतरा प्रकारचे अंबे येणार असल्याचे सांगितले, हे विकसित केलेले सेंद्रिय व होमिओपॅथिक तंत्रज्ञानाने पिकवलेले वाण पाहत कृषिमंत्री कोकाटे यांनी त्यांचे कौतुक केले.

यावेळी घाडगे यांनी आम्ही डाळिंब, पेरूप्रमाणे, आंब्याच्या फळाचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी प्रोटेक्शन बॅग (फळ सुरक्षा पिशवी) वापरल्याने फळाची उत्तम गुणवत्ता चांगली मिळाल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

त्यानंतर या पद्धतीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या वेळी माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे, माजी जी प सदस्य भारत शिंदे, मंदाकिनी घाडगे, गजानन घाडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, जिल्हा विकास अधिकारी हरिदास हावळे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन, मंडल कृषी अधिकारी संजय पाटील उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT