Soybean Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Damage : हजारो हेक्टरवरील उभे सोयाबीन पीक वाळले

Crop Damage : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील सोयाबीन पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हजारो हेक्टरवरील उभे सोयाबीन पीक अपरिपक्व अवस्थेतच वाळून गेले आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील सोयाबीन पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हजारो हेक्टरवरील उभे सोयाबीन पीक अपरिपक्व अवस्थेतच वाळून गेले आहे. त्यात दाणे न भरलेल्या शेंगांचे प्रमाण अधिक आहे.

अनेक शेतकऱ्यांकडील संपूर्ण पिकच वाळून गेेले आहे. त्यामुळे पीक उत्पादनावर केलेला खर्च वाया गेला आहे. होत्याचे नव्हते झाले अशी सध्या शेतकऱ्यांची स्थिती झाल्याने शेतकऱ्यांपुढील अडचणींत वाढ झाली आहे.

परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील सोयाबीन हे प्रमुख नगदी पीक आहे. यंदाच्या खरीप हंगामात परभणी जिल्ह्यात २ लाख ७१ हजार ७०८ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यात २ लाख ७७ हजार ८४४ हेक्टर पेरणी झाली आहे.

या दोन जिल्ह्यांत यंदा पावसाच्या आगमनानुसार पेरणी झाली. लवकर-उशिरा पेरणी झालेले पीक संवदेनशील अवस्थेत असताना जुलै, ऑगस्ट महिन्यांतील पावसाच्या दीर्घ खंडामुळे ताणावर गेले. तापमानातील वाढ, कमी झालेली आर्द्रता, विविध प्रकारच्या किडीचा प्रादुर्भावामुळे नुकसान झाले. फुले गळून गेले. शेंगा लागल्या नाहीत.

या दोन जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांतील सोयाबीनवर यंदा येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला. सप्टेंबर महिन्यात बुरशीजन्य खोडकुज, मूळकूज रोगाचा झपाट्याने प्रादुर्भाव झाला. काही सोयाबीन वाणांमध्ये या रोगांची तीव्रता अधिक दिसून येत आहे.

एका रात्रीच्या फरकाने उभे सोयाबीन शेंगामधील दाणे परिपक्व होऊन वाळून जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दाण्याचा आकार अत्यंत बारीक झाला आहे.

अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पिकांचे नुकसान झाल्याने हाती काहीच लागणार नाही. नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी केली आहे.

आमच्या गावातील अनेक शेतकऱ्यांकडील शेकडो एकरांतील सोयाबीन पीक वाळून गेले आहे. माझ्या २५ एकर सोयाबीन लागवडीतील ६० ते ७० टक्के शेंगांमध्ये दाणे भरले नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार आहे. सरकारने पंचनामे करून मदत करावी.
- शंकर गुट्टे, बेलुरा, जि. हिंगोली
जुलैमध्ये पेरणी केलेले साडेतीन एकरांवरील सोयाबीन पीक पूर्ण वाळून गेले आहे. पेरणी केले तेवढेही बियाणे उत्पादन मिळणार नाही. त्यामुळे मोठे नुकसान होईल.
- दीपक ढोकर, पिंपरी रोहिला, ता. जिंतूर, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT