SRT Technology Agrowon
ॲग्रो विशेष

SRT Technology : ‘एसआरटी’ तंत्रज्ञानाचा जागतिक स्वीकार होईलच

Chandrashekhar Bhadsawle : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाने एसआरटीला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून जमीन कसदार होण्याच्या कामात मोठी भूमिका निभावली असल्याचे मत एसआरटी तंत्रज्ञानाचे जनक चंद्रशेखर भडसावळे यांनी व्यक्त केले.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : सगुणा राईस (एसआरटी) तंत्रज्ञानाची चळवळ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उभी राहिली आहे. आज ना उद्या या तंत्राचा जागतिक स्वीकार होईल. त्यावेळी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वैचारिक व कृतिशील बाबींची नोंद प्राधान्याने घेतली जाईल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाने एसआरटीला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून जमीन कसदार होण्याच्या कामात मोठी भूमिका निभावली असल्याचे मत एसआरटी तंत्रज्ञानाचे जनक चंद्रशेखर भडसावळे यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भात पिकातील सगुणा राईस तंत्रज्ञान कपाशी, मका, बाजरी, तूर आदी पिकांमध्ये स्वीकारले आहे. जवळपास अडीच हजार एकरावर इतर पिकांमध्ये एसआरटी तंत्रज्ञानाचा विस्तार झाला आहे. त्याची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी एसआरटी तंत्रज्ञानाचे जनक श्री. भडसावळे गुरुवारी (ता. १८) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या तंत्रज्ञानाचा स्वीकार करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांधावर गेले.

यावेळी त्यांच्या समवेत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, अनिल नेवलकर, परशुराम आगिवले, सुरेश बेडवाल तसेच सिल्लोड फुलंब्री तालुक्यातील कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

श्री. भडसावळे यांनी सिल्लोड तालुक्यातील अन्वी तसेच बोदवड, फुलंब्री तालुक्यातील खामगाव व इतर ठिकाणी एसआरटी तंत्रज्ञानावर आधारित शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. अन्वी येथील कैलास भवर या शेतकऱ्यांच्या तिसऱ्या वर्षातील एसआरटी तंत्रज्ञान आधारित हरभरा पिकाची पाहणी केली.

श्री भडसावळे म्हणाले, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात इतर पिकांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर किती परिणामकारक व जमिनीच्या कसदारतेसाठी फायदेशीर ठरला हे त्यांनी पाहिले असते तर त्यांना या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधिक स्पष्टपणे जाणवले असते, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT