Onion Export Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export : श्रीलंकेनं कांद्यावरील आयात शुल्कात केली कपात; श्रीलंका सरकारचा निर्णय

आता मात्र श्रीलंकेतील कांदा संपण्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी श्रीलंकेत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dhananjay Sanap

Shri lanka News : श्रीलंकेने भारतीय कांदा आयातीवरील शुल्क २० टक्क्यांनी कमी रविवारी (ता.१) केले आहेत. त्यामुळं आता भारतातील कांदा श्रीलंकेला निर्यातीसाठी १० टक्के निर्यात शुल्क द्यावं लागणार आहे. परिणामी देशातील कांदा उत्पादकांना या निर्णयाचा फायदा होईल, अशी चर्चा आहे. श्रीलंकेत कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातून कांदा श्रीलंका आयात करणार आहे.

भारतातून कांदा आयात श्रीलंका करत असतो. पण श्रीलंकेनं कांदा आयातीवर ३० टक्के शुल्क लावलं होतं. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना कांदा निर्यात महाग पडत होती. परंतु आता मात्र श्रीलंकेतील कांदा संपण्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी श्रीलंकेत कांद्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातून श्रीलंकेतील नागरिकांचा संताप वाढू शकतो, अशी शक्यता दिसू लागली आहे. त्यामुळे श्रीलंकेनं कांदा आयातीवर फक्त १० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा भारतीय निर्यातदारांना होईल, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

श्रीलंका आयातदार

भारतीय कांद्याची बांगलादेशसोबतच श्रीलंकेतही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यामुळे भारतीय कांद्याचा श्रीलंका दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. परंतु केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरण लकव्याचा परिणाम दोन्ही देशातील व्यापार झाला आहे.

भारतातून श्रीलंकेला काय निर्यात होतं?

भारतातून श्रीलंकेला खनिज इंधन, तेल, तृणधान्य, कापूस यासारख्या वस्तूंची निर्यात केली जाते. भारतीय वाणिज्य दूतवासाच्या आकडेवारीनुसार दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापारात ४८ टक्के वाढ झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Dam Outflow : कोयनासह प्रमुख धरणांतून विसर्गात घट

Students Protest: झेन अल्फांनी वाकवले जिल्हा परिषद प्रशासन

Crop Insurance : अहिल्यानगर जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांचा पीकविमा योजनेत सहभाग

Kharif Sowing Update: धाराशिवमध्ये खरीप पेरण्या ८८ टक्क्यांवर; टक्केवारी घसरली तरी सोयाबीनसह पिकांची जोमदार वाढ

Ring Road Project : रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT