Rain Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गच्या काही भागांत पावसाचा शिडकावा

Sindhudurg Rain News : ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने बागायतदार हैराण झाले आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्याच्या काही भागांत रविवारी (ता. ७) सायकांळी पावसाचा शिडकावा झाला. जिल्ह्यात दिवसभर पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने बागायतदार हैराण झाले आहेत. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यात रविवारी पहाटे आणखी भर पडली. पहाटेपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पावसाळी वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली. सकाळी अकराच्या सुमारास कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती निर्माण झाली होती.

वैभववाडी, फोंडा परिसरातील काही गावांमध्ये हलका पाऊसदेखील झाला. परंतु त्यानंतर वातावरण जैसे थे राहीले. सायकांळी पावसाळी वातावरण अधिकच गडद झाले. जिल्ह्याच्या बहुतांश भागात हेच वातावरण होते. सोमवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

या वातावरणाचा मोठा परिणाम जिल्ह्यातील आंबा, काजू पिकावर जाणवणार आहे. जिल्ह्यातील आंबा, काजूला मोहर आणि फळधारणेची प्रकिया सुरू आहे. या वातावरणामुळे या पिकांवर तुडतुडे, थ्रिप्स, टी मॉस्किटो आदी कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंतचे वातावरण आंबा, काजू पिकांसाठी प्रतिकूल राहिले असल्यामुळे कीड-रोगांवर नियत्रंण मिळविण्याचा प्रयत्न बागायतदार करीत होते त्यातच वातावरणात पुन्हा बदल झाल्यामुळे आंबा, काजू पीक संकटात सापडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात ६ आणि ७ जानेवारी रोजी ढगाळ वातावरण राहिले आहे. त्यामुळे आंबा, काजूवर कीड-रोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा, काजू पिकांवर परागीकरणाचा काळ वगळून आणि पावसाचा अंदाज घेऊन विद्यापीठाने शिफारस केलेली कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्यात. त्यामध्ये स्टीकरचा वापर करावा.
- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, मुळदे संशोधन केंद्र

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT