Spice Crop Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Spice Crops : अकोल्यात ७२० एकरांवर मसाला पिके

Spice Crop Cultivation : पारंपरिक पिकांना पर्याय तसेच नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या मसालावर्गीय काळेजिरे, सोप, ओवा आदी पिकांना यंदाच्या रब्बी हंगामात लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Akola News : अकोला : पारंपरिक पिकांना पर्याय तसेच नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या मसालावर्गीय काळेजिरे, सोप, ओवा आदी पिकांना यंदाच्या रब्बी हंगामात लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्ह्यात या हंगामात सुमारे ७२० एकरांवर या विविध पिकांची लागवड होत आहे.

आत्मा यंत्रणा, कृषी विभागाच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मसाला पिकांच्या निविष्ठा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी म्हैसपूर या गावात शेतकऱ्यांना या निविष्ठांचे वितरणही केले. जिल्ह्यात मसालावर्गीय पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी वसंत अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे.

या अनुषंगाने जिल्ह्यात ७२० एकरांवर मसालावर्गीय पिकांची प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात मसाला पिकांचे क्षेत्र वाढावे व शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पादन मिळावे यासाठी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

अकोला जिल्ह्यात २१७ एकरांवर काळजिरे, १०० एकरांवर बडीशेप, २१७ एकरांवर ओवा, ५० एकरांवर कसुरी मेथी, १०० एकरांत धने अशा एकूण ७२० एकरांवर प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहेत. याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी म्हैसपूर येथे भेट देऊन शेतकऱ्यां-यांशी संवाद साधला.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राचे बियाणे पैदासकार डॉ. श्याम घावडे,आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, कृषी सहाय्यक मेघा नागे, शालिनी निखाडे आदी उपस्थित होते.

पिके व लागवड क्षेत्र

काळे जिरे :२१७ एकर

सोप : १०० एकर

ओवा : २१७ एकर

कसुरी मेथी : ५० एकर

धने : १०० एकर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC Inquiry: पुणे बाजार समिती गैरव्यवहाराच्या ‘चौकशी’ची पुन्हा चौकशी !

Agricultural College Irregularities: कृषी महाविद्यालयातील गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल पोलिसांकडे

Farm Machinery Bank: कृषी अवजारे बँकेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज

Fishing Season 2026: मासेमारीला ७६ दिवसांनी प्रारंभ

Tree Plantation Record: धाराशिवला बारा तासांत १० लाख रोपांची लागवड; जिल्हा प्रशासनाचा सलग दुसऱ्या वर्षी विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT