Spices Agrowon
ॲग्रो विशेष

Spices Crop : मसाला पिकांमुळे आर्थिक स्थिती सुधारू शकते ः डॉ. घावडे

Spices Farming : साधारणपणे दोन ते तीन पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. रासायनिक खतांची फारशी गरज लागत नाही. जर खते द्यायचीच असतील तर सेंद्रिय खतांचा वापर करावा.

Team Agrowon

Akola News : मसालावर्गीय पिकांच्या लागवडीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते, असा आशावाद डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. एम. घावडे यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून कृषी वसंत अभियान राबविण्यात येत असून मसाला पिकांच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामार्फत ओवा, बडीसोप, धने, काळेजिरे, कसुरी मेथी आदी मसालेवर्गीय पिकांचे प्रात्यक्षिक या हंगामात राबविण्यात आले. त्याअंतर्गत बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथे मसालेवर्गीय पिकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. याठिकाणी डॉ. घावडे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला सरपंच रेखाताई धुमाळे, आत्मा समिती सदस्य रामदास भानगे, बियाणे उपसंचालक डॉ. डी. टी. देशमुख, तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, कृषी सहाय्यक उद्धव धुमाळे, नवनाथ धुमाळे, महादेव धुमाळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

डॉ. घावडे यांनी ओवा, बडीसोप, धने, काळेजिरे, कसुरी मेथी यांसारख्या नवीन पिकांच्या लागवडीबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. ही पिके शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. पिकांना वन्यप्राण्यांचा त्रास कुठलाच नसून कमी पाण्यामध्ये घेता येतात. साधारणपणे दोन ते तीन पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात.

रासायनिक खतांची फारशी गरज लागत नाही. जर खते द्यायचीच असतील तर सेंद्रिय खतांचा वापर करावा. त्याचप्रमाणे मसालेवर्गीय पिकांची बाजारपेठ उपलब्ध आहे, असेही शेतकऱ्यांना सांगितले. मार्गदर्शनानंतर ओवा पिकाच्या प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली.

या प्रशिक्षणासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक उद्धव धुमाळे, जीवन परघरमोर, महादेव धुमाळे, उमेश धुमाळे, अवधूत धुमाळे, देवराव परघरमोर आदींनी पुढाकार घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune APMC Inquiry: पुणे बाजार समिती गैरव्यवहाराच्या ‘चौकशी’ची पुन्हा चौकशी !

Agricultural College Irregularities: कृषी महाविद्यालयातील गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल पोलिसांकडे

Farm Machinery Bank: कृषी अवजारे बँकेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज

Fishing Season 2026: मासेमारीला ७६ दिवसांनी प्रारंभ

Tree Plantation Record: धाराशिवला बारा तासांत १० लाख रोपांची लागवड; जिल्हा प्रशासनाचा सलग दुसऱ्या वर्षी विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT