Agriculture Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Season : करमाळ्यातील उत्तर भागात खरीप पेरणीला वेग

Sowing Update : पावसाने विश्रांती दिल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. मुबलक ओलावा व पेरणीसाठी वाफसा झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

Team Agrowon

Karmala News : पावसाने विश्रांती दिल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे. मुबलक ओलावा व पेरणीसाठी वाफसा झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रांच्या साह्याने पेरणीला पसंती दिली आहे.

दुष्काळी स्थितीनंतर यावर्षी करमाळा तालुक्यातील उत्तर भागात अवकाळी व मृग नक्षत्रात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. करमाळा तालुक्यातील पोथरे, करंजे, बिटरगाव‌ श्री, तरटगाव आदी परिसरात पेरणीची लगबग सुरू झाली आहे.

उडीद, तूर, मका, सोयाबीन, कापूस या पिकांची पेरणी सुरू आहे. आधुनिक यंत्रांच्या साह्यामुळे पेरणी सोपी झाल्याने शेतकऱ्यांनी या यंत्रांद्वारे पेरणी केली जात आहे. एका ट्रॅक्टरने दिवसा सात ते आठ एकर पेरणी होत असल्याने पेरणी लवकर संपणार आहे. सकाळी सातपासूनच शेतात शेतकरी राबू लागला आहे. यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणी होत असल्याने पिकेही जोमदार येतील व उताराही चांगला मिळेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.

आधुनिक यंत्राने पेरणी चांगली होते. शिवाय ट्रॅक्टरमुळे कमी कष्टात व कमी वेळात जास्त पेरणी होते. त्यामुळे आधुनिक यंत्रांद्वारे पेरणी केली आहे.
परसराम शिंदे. शेतकरी, पोथरे
मृग नक्षत्रात पेरणी होत असल्याने पिके चांगली येतील. शिवाय लवकर पेरणी झाल्याने पिके लवकर निघून रब्बी हंगामही वेळेत होईल. मृग नक्षत्रातील पेरणीला उत्पादन चांगले मिळते.
हनुमंत साबळे, शेतकरी, भालेवाडी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Issue: अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी धास्तावले

RTE Admission: राज्यात आरटीई प्रवेशाच्या जागांमध्ये मोठी घट

Rabi Crops: पावणेअठरा लाख हेक्टरवर रब्बीचे क्षेत्र

Sangli Water Crisis: सांगलीमध्ये तीन महिन्यांत पाणीसाठ्यात २८ टक्के घट

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

SCROLL FOR NEXT