Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील सोयाबीनच्या सर्वसाधारण २२ लाख ९८ हजार १५५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २३ लाख ३८ हजार ७३५ हेक्टरवर म्हणजे सुमारे १०१.७७ टक्के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. दुसरीकडे १४ लाख ७९ हजार ५३५ हेक्टर कपाशीच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११ लाख ९० हजार ७७५ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्याला शेतकऱ्यांनी आजवर पसंती दिली आहे.
मराठवाड्यातील ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ४४ लाख ९० हजार ९६९.०५ हेक्टर म्हणजे सुमारे ९०.३१ प्रत्येक क्षेत्रावर खरिपाची पेरणी आटोपली आहे. कपाशीची अपेक्षेच्या तुलनेत लागवड होणार नाही हा अंदाज आता खरा ठरण्याची चिन्ह आहेत. दुसरीकडे दर परवडणारे नसले तरी सोयाबीनची मात्र सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत थोडी पुढे जाऊन पेरणी झाल्याची स्थिती आहे.
कपाशी उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण ३ लाख ८८ हजार ५३३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ७८ हजार १४३ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ७१.५९ टक्के आहे.या जिल्ह्यात कपाशीला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी मका क्षेत्राकडे वळल्याची स्थिती आहे.
जालना जिल्ह्यातील कपाशीच्या सर्वसाधारण ३ लाख २२ हजार ३२५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ८३.६० टक्के म्हणजे २ लाख ६९ हजार ४७५ हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे. बीड जिल्ह्यात कपाशीच्या सर्व साधारण ३ लाख २३ हजार ८८९ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६९.६९ टक्के म्हणजे सुमारे २ लाख २५ हजार ८११ हेक्टरवर कपाशी लागवड झाली आहे.
परभणी जिल्ह्यात कपाशीच्या सर्वसाधारण १ लाख ९१ हजार ९५४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ८१ हजार ७३८ हेक्टरवर म्हणजे सुमारे ९४.६८ टक्के, नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण २ लाख १ हजार ४६० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ९१.३६ टक्के म्हणजे सुमारे १ लाख ८६ हजार ५५ हेक्टर, धाराशिव जिल्ह्यात सर्वसाधारण १६३७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १६१ हेक्टरवर, लातूर जिल्ह्यातील सर्वसाधारण ९३७६.८५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १२ हजार ७६१.५० हेक्टर,हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारण ४० हजार ३५७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ९०.७६ टक्के म्हणजे ३६ हजार ६३० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली आहे.
जिल्हानिहाय सोयाबीन पेरणी स्थिती...
सोयाबीन उत्पादक जिल्हे म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्यांपैकी लातूर जिल्ह्यात सर्वसाधारण ४ लाख ४५ हजार ८९५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४ लाख ५९ हजार १६२ हेक्टर, धाराशिव जिल्ह्यात सर्वसाधारण ४ लाख १९ हजार ४८० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४ लाख १६ हजार ९१८ हेक्टर, नांदेड जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ४२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ४ लाख ३५ हजार ६४६ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात २ लाख ४८ हजार ६५५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ५० हजार ११३.१० हेक्टर, बीड जिल्ह्यात सर्वसाधारण ३ लाख २ हजार ६५२.३४ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ३ लाख ९ हजार ३९६ हेक्टर,जालना जिल्ह्यात १ लाख ८१ हजार ५७५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ९४ हजार २७९ हेक्टर तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण २७ हजार ८७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २९ हजार ४१६ हेक्टर सोयाबीनची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.