Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : मूग, उडीद, तुरीच्या पेरण क्षेत्रात घट

Kahrif Season : परभणी हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद, तूर या कडधान्यांच्या क्षेत्रातील घट यंदाही कायम आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी हिंगोली जिल्ह्यात मूग, उडीद, तूर या कडधान्यांच्या क्षेत्रातील घट यंदाही कायम आहे. यावर्षी खरिपात शुक्रवार (ता. १८) पर्यंत परभणी जिल्ह्यात ३९ हजार ३६४ हेक्टर (५९.०३ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात ३९ हजार १६५ हेक्टर (६६.३९ टक्के) मिळून एकूण कडधान्यांची ७८ हजार ५२९ हेक्टरवर पेरणी झाली.

एकूण खरीप पिकांची परभणी जिल्ह्यात ४ लाख ७७ हजार ५०७ हेक्टर (९२.१० टक्के) तर हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार ८०९ हेक्टरवर (८४.७७ टक्के) मिळून एकूण ८ लाख २५ हजार ३१६ हेक्टरवर पेरणी झाली आहे, माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली.

कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार, परभणी जिल्ह्यात सरासरी ५ लाख १८ हजार ४६७ पैकी ४लाख ७७ हजार ५०७ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात एकूण कडधान्याची ६६ हजार ६८१ पैकी ३९ हजार ३६४ हेक्टर पेरणी झाली त्यात तुरीची ४२ हजार ६०२ पैकी ३२ हजार ८०९ हेक्टर (७७.०४ टक्के), मुगाची १७ हजार ६०० पैकी ४ हजार ६९१ हेक्टर (२६.६६ टक्के), उडदाची ६ हजार ४१३ पैकी १ हजार ८०९ हेक्टरवर (२८.२१ टक्के) पेरणी झाली.

सोयाबीनची २ लाख ५४ हजार ५४ पैकी २ लाख ५० हजार ५०हेक्टर (९८.४२ टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांची ५ हजार ४४९ पैकी १ हजार २८४ हेक्टर पेरणी झाली. त्यात ज्वारीची ३ हजार ८५७ पैकी ७१४ हेक्टर, बाजरीची ४९९ पैकी ८९ हेक्टर, मक्याची ९८३ पैकी ४७६ हेक्टर पेरणी झाली आहे. कपाशीची १ लाख ९१ हजार ९५४ पैकी १ लाख ८६ हजार ६६३ हेक्टर (९७.२४टक्के) लागवड झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात सरासरी ४ लाख १० हजार ३९८ पैकी ३ लाख ४७ हजार ८०९हेक्टरवर (८४.७४टक्के) पेरणी झाली. त्यात एकूण कडधान्यांची ५८ हजार ९९३ पैकी ३९ हजार १६५ हेक्टर पेरणी झाली. त्यात तुरीची ३१ हजार ५४८ हेक्टर (६९.६३ टक्के), मुगाची ४ हजार २५२ हेक्टर (५४.६५ टक्के), उडदाची ३ हजार १५२ हेक्टर (५३.६१ टक्के) पेरणी झाली.

सोयाबीनची २ लाख ५६ हजार ४०४ पैकी २ लाख ६९ हजार ११३ हेक्टरवर (१०४.९५ टक्के) पेरणी झाली. तृणधान्यांची २ हजार ८३५ हेक्टर पेरणी झाली. त्यात ज्वारीची २ हजार ५६१ हेक्टर, बाजरीची १३ हेक्टर, मक्याची २३६हेक्टर पेरणी झाली.

कपाशीची ३८ हजार ८२१ पैकी ३६हजार ६३० हेक्टरवर (९४.३६ टक्के) लागवड झाली. या दोन जिल्ह्यांत मूग, उडदाच्या क्षेत्रात मोठी घट झाली असून तुरीची पेरणीही कमी झाली आहे.

Kharif Sowing

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nandini River Conservation: नंदिनी नदीचा श्वास मोकळा करण्यासाठी राबले हात

Social Awareness: सुशिक्षित समाजातील अंधश्रद्धा अधिक धोकादायक : माजी खासदार कुमार केतकर

Ahilyanagar MLAs: अहिल्यानगर ठरला राज्यातील सर्वाधिक आमदारांचा जिल्हा

Agriculture Awareness Campaign: संतुलित खत वापरासाठी कृषी विज्ञान केंद्राची जनजागृती मोहीम

Farm Loan Waiver Controversy: अटी, शर्तींचे जाळे टाकून शेतकऱ्यांची फसवणूक; कर्जमाफीवर विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT