Soybean Production Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Production : सोयाबीनचा उतारा अर्ध्यापेक्षाही कमी

Soybean Harvesting : यंदा दरवर्षीपेक्षा अर्धाही उतारा नाही. त्यामुळे शेतकरी कमालीचे चिंताग्रस्त झाले आहेत.

Team Agrowon

Washim News : सोयाबीनचा हंगाम सुरू झाला आहे. कापणी व मळणीच्या कामांनी वेग घेतला आहे. यंदा दरवर्षीपेक्षा अर्धाही उतारा नाही. त्यामुळे शेतकरी कमालीचे चिंताग्रस्त झाले आहेत. उशिरा व अनियमित पाऊस, उशिराची पेरणी, ‘येलो मोझॅक’मुळे सोयाबीनचे पीक हातातून गेले आहे.

परिणामी, सोयाबीन उत्पादक आर्थिक अडचणीत आला आहे. पीकविमा भरपाईसह सरकारनेही मदत करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. सध्या एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन मिळू लागले आहे.

सोयाबीन हे शेतकऱ्यांचे मुख्य पीक झाले आहे. एकूण क्षेत्राच्या ९० टक्के सोयाबीनची पेरणी केली जाते. खरीप हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कोरडवाहू शेतकऱ्यांची या हंगामावरच खरी भिस्त अवलंबून असते.

या वर्षी खरिपाच्या पेरण्या तब्बल एक महिना उशिराने झाल्या. सुरुवातीपासूनच पाऊस अनियमित पडल्यामुळे सोयाबीनसह खरिपाची सर्वच पिके संकटात सापडली होती. सोयाबीन फुलोऱ्यात असताना पावसाने मोठा खंड दिला.

त्याचा परिणाम आता दिसून येत आहे. त्यानंतर शेंगा परिपक्व होण्याच्या कालावधीत ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येत आहे.

सध्या सोयाबीन सोयाबीन काढणी सुरू झाली आहे. यंत्राद्वारे मळणीचे काम सुरू आहे. दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी सोयाबीनचा उतारा अर्ध्यापेक्षाही कमी येत आहे. काढणीसह इतर सर्व खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोयाबीनचे भावसुद्धा ४ हजारांवर येऊन ठेपले आहेत.

सात एकर शेती आहे. मागील वर्षी एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीन झाले होते. या वर्षी एकरी तीन क्विंटलचा उतारा येत आहे. झालेला खर्चही वसूल होणे शक्य नाही.
- विष्णू लांडगे, शेतकरी, भोकरखेड, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : मॉन्सूनचा वेगवान प्रवास; मुंबई गाठली, संपूर्ण मराठवाडा व्यापला, विदर्भात वर्ध्यापर्यंत मजल

Livestock Fodder Management: कमी पावसाच्या परिस्थितीत शाश्‍वत चारा व्यवस्थापन

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

SCROLL FOR NEXT