Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement : खेडमध्ये सोयाबीन खरेदी सुरू

NAFED Update : ‘नाफेड’ संस्थेकडून शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम २०२४-२५ मध्ये उत्पादन झालेल्या सोयाबीन, उडीद आणि मूग या वाणांची खरेदी होणार आहे.

Team Agrowon

Khed News : ‘नाफेड’ संस्थेकडून शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम २०२४-२५ मध्ये उत्पादन झालेल्या सोयाबीन, उडीद आणि मूग या वाणांची खरेदी होणार आहे. खेड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघात मंगळवारपासून (ता. १९) सोयाबीन पिकाची खरेदी सुरू करण्यात आली.

संघाचे अध्यक्ष नामदेव कलवडे, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या हस्ते या खरेदीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी माजी अध्यक्ष आनंदराव काळे, बाळासाहेब राळे, तिन्हेवाडी सोसायटीचे अध्यक्ष मधुकर सांडभोर आदी उपस्थित होते.

खेड तालुक्यात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. खरेदी-विक्री संघात नाफेडच्या निर्देशानुसार होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना प्रति किंटल ४ हजार ८९२ रुपये भाव देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे लेखाधिकारी भास्कर जगदाळे यांनी या वेळी दिली.

खेडमधील ५०० शेतकऱ्यांची नोंदणी

खेड तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला एकरी ५२० किलो सोयाबीन येथील केंद्रात विक्रीसाठी आणता येणार आहे. खरेदी केलेल्या सोयाबीनची रक्कम ७२ तासांत पोर्टलद्वारे किंवा तांत्रिक अडचणी आल्यास १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे असे नाना टाकळकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

Rainfall Deficit Impact: ऑगस्ट संपत आला तरी रान पेरणीविना ओस

SCROLL FOR NEXT