Soybean Agarowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : सोयाबीन बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमीच; शेतकरी मेटाकुटीला

Soybean Update : राज्यातील विधानसभेचे आज मतदान आहे. मात्र शेतकऱ्यांना बाजारात सोयाबीनसाठी उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे.

Anil Jadhao 

Pune News : राज्यातील विधानसभेचे आज मतदान आहे. मात्र शेतकऱ्यांना बाजारात सोयाबीनसाठी उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. यंदा उतारा कमी झाला. मात्र उत्पादन खर्च वाढला. त्यामुळे सोयाबीनचा उत्पादन खर्च यंदा ५ हजारांवर पोचला , असे शेतकरी सांगत आहेत. पण बाजारात सोयाबीनला ४ हजार २०० रुपयांचा सरासरी भाव मिळत आहे. 

निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधक सोयाबीनला ६ हजार आणि ७ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र प्रत्यक्षात सोयाबीनला उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा सोयाबीनचा एकरी उतारा कमी झाला. दुसरीकडे सरकार आणि उद्योगांच्या संघटना देशातील सोयाबीन उत्पादन चांगले असल्याचे सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात शेतकरी एकरी उतारा २० ते ३० टक्क्यांपर्यंत कमी आल्याचे सांगतात. 

एकरी सोयाबीनचा उतारा कमी झाला. मात्र उत्पादन खर्च स्थिर राहिला किंवा वाढला. त्यामुळे क्विंटलचा उत्पादन खर्च वाढला. यंदा उतारा कमी असल्याने सोयाबीनचा क्विंटलचा उत्पादन खर्च  किमान ५ हजारांच्या पुढे गेल्याचे शेतकरी सांगत आहे. यंदा एकरी ४ ते ५ क्विंटल सोयाबीन मिळाले. तर उत्पादन खर्च २० ते २५ हजार झाला. म्हणजेच क्विंटलमागे सोयाबीनचा उत्पादन खर्च ५ हजारांच्या दरम्यान आल्याचे बहुतांशी शेतकऱ्यांनी सांगितले. 

भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी

सोयाबीनचा क्विंटलचा उत्पादन खर्च ५ हजारांवर पोचला. मात्र बाजारात मिळणारा भाव उत्पादन खर्चापेक्षा क्विमान ८०० रुपयांनी कमी आहे. बाजारात सध्या सोयाबीनला सरासरी ४ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना एकरी तोटा ४ हजारांचा होत असल्याचे शेतकरी सांगत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. 

हमीभावही मिळेना

सरकारने यंदा सोयाबीनला हमीभाव देऊ असे आश्वासन दिले होते. निवडणुकीच्या तोंडावर सरकारने हमीभावाने सोयाबीन खरेदीला मान्यता दिली. पण ओलाव्याची अडचण, खरेदीत बारदाणाची टंचाई आणि इतर कारणांमुळे राज्यात हमीभावाने सोयाबीन खरेदी नावापुरतीच सुरु आहे, असे शेतकरी सांगतात. यंदा हमीभाव ४ हजार ८९२ रुपये आहे. मात्र बाजारात सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे भाव मिळत नाही. हमीभावापेक्षाही क्विंटलमागे ७०० रुपये कमी भाव मिळत आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT