Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Compensation : सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

Soybean Crop Insurance : नांदेडला सोयाबीन पक्वतेपूर्वीच पिवळे पडून वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेडला सोयाबीन पक्वतेपूर्वीच पिवळे पडून वाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान होत आहे.याबाबत कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.

परंतु नांदेडला मात्र अद्याप पंचनामे पूर्ण झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यात यंदा सर्वाधिक साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. या पिकावर मात्र मागील काही वर्षापासून रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात पिकाचे नुकसान झाल्यानंतर बुरशीजन्य रोगामुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीनला बाधा झाली. परिणामी उत्पादनात चाळीस ते ८० टक्क्यांपर्यंत घट येण्याचा अंदाज व्यक केला आहे.

जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर यलो मोझॅक या विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. याबाबत कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे,

असे निर्देश सरकारने दिले होते. यानुसार जिल्हा प्रशासनाने महसूल, कृषी व ग्रामसेवकांना पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतरही अद्याप पंचनामे झाले नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT