Cultivation Update
Cultivation Update Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cultivation : सोयाबीनची लागवड यंदा पोहोचणार ४ लाख हेक्टरवर

Team Agrowon

Soybean Buldana News : बुलडाणा जिल्ह्याच्या एकूण खरीप क्षेत्रापैकी सुमारे चार लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड होण्याची शक्यता पाहून कृषी विभागाने खत, बियाण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे तीन लाख एक हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे.

जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र चार लाख ४३ हजार ३२० हेक्टर असून, यामध्ये चार लाख १४४३ हेक्टर हे केवळ सोयाबीन राहणार आहे. उर्वरित ३ लाख ४१ हजार ८७७ हेक्टरमध्ये कपाशी, ज्वारी, मूग, उडीद व इतर पिकांची लागवड अपेक्षित आहे. खरिपात प्रामुख्याने जवळपास ५० टक्क्यांवर सोयाबीनचीच लागवड होणार आहे.

कपाशीची लागवड घटणार

कृषी खात्याच्या नियोजनानुसार या हंगामात एक लाख ९८ हजार ७१५ हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे. मागील हंगामात हे क्षेत्र दोन लाख ३५१० हेक्टर होते. यंदाच्या क्षेत्रासाठी सुमारे नऊ लाख ९३ हजार ५७५ बीटी कापूस बियाणे पाकिटांची आवश्यकता आहे. तशी मागणी करण्यात आली.

इतर पिकांची नियोजित क्षेत्र

या वर्षात खरिपात मक्याची २२ हजार ३५० हेक्टरवर लागवड नियोजित आहे. तसेच संकरित ज्वारी ७२०० हेक्टर, बाजरी १२७, तूर ८१ हजार ३०० हेक्टर, मूग १५ हजार, उडीद १४ हजार ११० हेक्टरवर पेरणी होण्याची शक्यता आहे. मूग-उडदाची लागवड ही सरासरी क्षेत्राच्या कमी होण्याची शक्यता आहे.

खत मागणी

हंगामासाठी युरिया ४१ हजार ३०० टन, डीएपी २४६००, एमओपी ४८००, इतर खते ८२ हजार ८५० टन, एसएसपी १६ हजार ५१० टन असा एकूण १ लाख ७१ हजार ६६० टन खत साठ्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीविरुद्ध शासनाने १ लाख ८० हजार २९० टन साठ्याला मंजुरी दिली आहे.

सोयाबीन लागवडीची आकडेवारी

प्रस्तावित क्षेत्र - ४ लाख १४४३ हेक्टर

लागणारे बियाणे- ३ लाख १ हजार ८२ क्विंटल

बदलानुसार लागणारे बियाणे- १ लाख ५३७८ क्विंटल

महाबीज- १४९७६ क्विंटल

राबिनी- ५००० क्विंटल

खासगी कंपन्या- ८५ हजार ४०२ क्विंटल

शेतकऱ्यांकडील बियाणे - ४४०१८५ क्विंटल

एकूण क्विंटल - ५४५५६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT